कार अपघातात जागीच चार जण ठार; वाशिम-शेलुबाजार मार्गावर अपघात, लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक

नागपुरहून लग्न् आटोपून घरी परतत असताना वाशिम-शेलुबाजार मार्गावर सोयता फाट्याजवळ कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला.  उभा असलेल्या ट्रक्टरला कारने धडक दिल्याने या अपघातात चार जण जागीच ठार झाले.

कार अपघातात जागीच चार जण ठार; वाशिम-शेलुबाजार मार्गावर अपघात, लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Feb 15, 2022 | 11:40 PM

वाशिम: नागपुरहून लग्न् आटोपून घरी परतत असताना वाशिम-शेलुबाजार मार्गावर सोयता फाट्याजवळ कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला.  उभा असलेल्या ट्रक्टरला कारने (Car) धडक दिल्याने या अपघातात (Accident) चार जण जागीच ठार (Death) झाले. तर नऊ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची पोलिसात तक्रार नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे. हा अपघात इतका भीषण होता की, उभा असलेल्या ट्रॅक्टरला कारने जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला होता. कारची ट्रॅक्टरला धडक बसताच जागेवर चौघांचा मृत्यू झाल्याने अनेक जणांना याचा धक्का बसला. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले. अपघातातील सर्व जण वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहागीर येथील आहेत

वाशिम शेलूबाजार मार्गावर झालेल्या अपघातात दोन मुले, एक महिला आणि पुरूष मंडळी होती. हे सर्वजण त्यांच्या परिचयातील नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. या झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

थांबलेल्या ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक

नागपूरहून लग्न करून परतत असताना हा सोयता फाट्याजवळ हा अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टरला कारने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. जखमींनी पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसात झाली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. कारमधील चौघेजण जागीच ठार झाल्याने अपघातानंतरची झालेली परिस्थिती विदारक होती.

सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातात अनेकांचा हाकनाक बळी जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही कारचालक आणि इतर चालक, वाहक या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे राज्यमार्ग अथवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस यंत्रणा करत असते.

संबंधित बातम्या

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू; किसान आंदोलनामुळे आला होता चर्चेत

अहमदनगरमध्ये 6 गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसे जप्त; दोघेजण ताब्यात; गावठी कट्टे वापरणाऱ्यांचा शोध सुरू

हातावर मोबाइल नंबर, प्रकृती खंगलेली, जालन्यातील गायब एसीबीचे पोलिस सापडले, पण गूढ आणखी वाढलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें