पडकं घर, बाजूला विहीर, सीसीटीव्हीत खरंच भूत? नागपुरात रंगलीय भुताची चर्चा

नागपूरच्या शताब्दी नगर भागात सध्या एका भुताच्या अफवेची खूप चर्चा आहे. राजेंद्र मेश्राम यांच्या घराच्या सीसीटीव्हीमध्ये एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जातांना दिसली.

पडकं घर, बाजूला विहीर, सीसीटीव्हीत खरंच भूत? नागपुरात रंगलीय भुताची चर्चा
पडकं घर, बाजूला विहीर, सीसीटीव्हीत खरंच भूत? नागपुरात रंगलीय भुताची चर्चा
गजानन उमाटे

| Edited By: चेतन पाटील

Jul 29, 2021 | 6:44 PM

नागपूर : या जगात भूत अस्तित्वात आहे की नाही? याबाबत अनेकांच्या वेगवेगळ्या भावना आणि विचार आहेत. काही जणांनी लहानपणी भुताच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. काहीजण टीव्हीवरच्या हॉरर सीरिअल बघून त्यांची भुताशी ओळख होते. तर काही जणांना मित्र-मैत्रिणींकडून भुताची माहिती होते. भुताचे पाय उलटे असतात, भुतांमध्ये चेटकीण सारखेही प्रकार असतात, अशा वेगवेगळ्या चर्चा आपण ऐकल्या आहेत. पण खरंतर अशा भुतांना आजवर कुणीच पाहिलेलं नाही.

अनेकजण त्यांच्या गावातील कुठल्यातरी एका शूरवीर माणसाने भुतासोबत कुस्ती खेळल्याचा दावा करतात. विज्ञानाने हे सगळे दावे-प्रतिदावे फेटाळले आहेत. तरीही लोकांच्या मनातून भूत मात्र जात नाही. नागपुरातही सध्या एका भुताची प्रचंड चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा भूत आता सीसीटीव्हीतही कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपूरच्या शताब्दी नगर भागात सध्या एका भुताच्या अफवेची खूप चर्चा आहे. राजेंद्र मेश्राम यांच्या घराच्या सीसीटीव्हीमध्ये एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जातांना दिसली. त्यांनतर मेश्राम कुटुंबीयांनी हे भूत असल्याचा दावा केला आणि परिसरात इतरांना माहिती दिली. मात्र, स्थानिकांनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ती प्रतिमा प्लास्टिकची पिशवी असल्याचं सांगत मेश्राम कुटुंबियांचा दावा फेटाळून लावला आहे.

मुलीने विहिरीत आत्महत्या केल्याने भूत असल्याची चर्चा

राजेंद्र मेश्राम हे नागपूरच्या शताब्दी नगरमध्ये राहतात. ते व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. त्यांच्या घरच्या सीसीटीव्हीमध्ये 19 जुलैला रात्री साडेबारा वाजता एक प्रतिमा कैद झाली. सीसीटीव्हीमध्ये एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जातांना दिसत आहे. त्यांनतर मेश्राम कुटुंबीयांनी हे भूत असल्याची भीती मनात धरली. त्यांच्या घराशेजारी एक पडके घर आहे. त्यात कोणी राहत नाही. त्याच घराच्या बाजूला एक विहीर आहे. काही वर्षांआधी एका मुलीने तिथे आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या भागात भूत असल्याची अफवा पसरली आहे.

भूत असल्याचं सिद्ध झालं तर 25 लाख देऊ : अनिस

“नागपुरात भुताटकीच्या प्रकाराची चर्चा सुरु आहे. भूत सीसीटीव्ही बंदिस्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण आम्ही संबंधित ठिकाणी जाऊन या प्रकाराची शाहनिशा करण्याचा प्रयत्न केला. राजू मेश्राम हा रिक्षाचालक आहे. त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या घराबाहेर सीसीटीव्ही लावले होते. कारण त्याची रिक्षा चोरीला जाईल, अशी त्याला भीती होती. या घटनेबाबत जो दावा केला जातोय त्यादिवशी 19 जुलैला रात्री 12 वाजून 36 मिनिटांनी इलेक्ट्रिक बोर्डावर स्पार्किंग झालं होतं. यावेळी एक बॉक्स राजू यांच्या घराजवळून गेला होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही ते बघितलं तेव्हा एक प्रतिमा तिथून गेली असा दावा करण्यात आला. लोक म्हणतात हा भुताटकीचा प्रताप आहे. ज्या घरी ही घटना घडली त्यांनी तक्रार केली नाही. ही भुताटकी खरी असल्याचं जो सिद्ध करेल त्याला अनिंसकडून 25 लाख दिले जातील”, अशी प्रतिक्रिया अंनिसचे पदाधिकारी हरीश देशमुख यांनी दिली.

हेही वाचा :

कुख्यात गुंडाचा जामीन अर्ज फेटाळला म्हणून न्यायाधीशाची हत्या? झारखंडचं संतापजनक प्रकरण, सीसीटीव्ही फुटेजमुळे कृत्य उघड

पोलीस कॉन्स्टेबल असल्याचा माज? तरुणाला मरेपर्यंत मारलं, नंतर फेकून दिलं, मारहाणीचा व्हिडीओ समोर

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें