AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Attack : नागपूरमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला

पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार फिर्यादी रवींद्र पराते हे बाबा ताजं चौकातून त्यांच्या दुचाकीने जात होते. यावेळी पराते यांच्या दुचाकीचा आरोपी इरफान पठाणच्या गाडीला कट लागला. कट लागल्याने इरफानने रवींद्र सोबत वाद घातला. वाद इतका टोकाला गेला की इरफानने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने रविंद्रच्या हातावर, पोटावर आणि डोक्यावर वार केले.

Nagpur Attack : नागपूरमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला
नागपूरमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्लाImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 06, 2022 | 6:17 PM
Share

नागपूर : दुचाकीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणा (Minor Dispute)वरून एका दुचाकी चालकावर प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची घटना नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. इरफान पठाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रविंद्र पराते असे हल्ला झालेल्या दुचाकी (Two Wheeler) चालकाचे नाव आहे. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. मात्र शुल्लक कारणांवरून अशा पद्धतीने जीवघेणे हल्ले भर वस्तीत होत असतील तर नक्कीच नागपुरात गुन्हेगारांवर कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो.

हल्ल्यात पराचे गंभीर जखमी

पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार फिर्यादी रवींद्र पराते हे बाबा ताजं चौकातून त्यांच्या दुचाकीने जात होते. यावेळी पराते यांच्या दुचाकीचा आरोपी इरफान पठाणच्या गाडीला कट लागला. कट लागल्याने इरफानने रवींद्र सोबत वाद घातला. वाद इतका टोकाला गेला की इरफानने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने रविंद्रच्या हातावर, पोटावर आणि डोक्यावर वार केले. पराते यांना गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत् इरफानने केला. रवींद्रला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी इरफान पठाणवर गुन्हा दखल केला असून त्याला अटक देखील केली आहे.

बीडमध्ये संपत्तीच्या वादातून भावाकडून नायब तहसिलदारावर हल्ला

संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावानेच महिला नायब तहसिलदारावर कार्यालयातच कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. आशा वाघ असे हल्ला करण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. या हल्ल्यात वाघ गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  (In Nagpur a youth was attacked out of anger over a two-wheeler cut)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...