Beed Attack : बीडमध्ये महिला नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला, संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावाकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

आशा वाघ या केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्या नेहमीप्रमाणे सोमवारी तहसील कार्यालयात आस्थापना शाखेत बसल्या होत्या. यावेळी त्यांचा सख्खा भाऊ तेथे आला आणि त्याने या ठिकाणी येऊन गोंधळ घातला. या वादादरम्यान अचानक धारदार कोयत्याने वाघ यांच्यावर हल्ला चढवत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Beed Attack : बीडमध्ये महिला नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला, संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावाकडून जीवे मारण्याचा प्रयत्न
बीडमध्ये महिला नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला
Image Credit source: TV9
महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 06, 2022 | 5:30 PM

बीड : बीडच्या केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या हल्ल्यात नायब तहसीलदार (Tehsildar) जखमी झाल्या आहेत. संपत्ती (Property)च्या वादातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. आशा वाघ असे जखमी नायब तहसीलदारांचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आशा वाघ यांच्या सख्ख्या भावानेच हा हल्ला केला आहे. यावेळी कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी वाघ यांच्या भावाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावानेच केला हल्ला

आशा वाघ या केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्या नेहमीप्रमाणे सोमवारी तहसील कार्यालयात आस्थापना शाखेत बसल्या होत्या. यावेळी त्यांचा सख्खा भाऊ तेथे आला आणि त्याने या ठिकाणी येऊन गोंधळ घातला. या वादादरम्यान अचानक धारदार कोयत्याने वाघ यांच्यावर हल्ला चढवत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर भावाला रूममध्ये कोंडून पोलिसांना पाचारण केलं. सध्या जखमी झालेल्या आशा वाघ यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. संपत्तीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें