नागपूर हादरलं, डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची आत्महत्या, शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का

डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी त्यांच्या राहत्या घरी नवव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्या त्या पत्नी होत्या.

नागपूर हादरलं, डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची आत्महत्या, शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का
जोत्स्ना मेश्राम

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी सोमवारी आत्महत्या केली. डॉ.ज्योत्स्ना मेश्राम यांच्या आत्महत्येमुळं नागपूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी त्यांच्या राहत्या घरी नवव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्या त्या पत्नी होत्या. तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या. मेश्राम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पतीच्या निधनानंतर मानसिक तणावात असल्याची माहिती

डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांचे पती जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम यांचं मार्च महिन्यात निधन झालं होतं. सुधीर मेश्राम यांच्या निधनानंतर जोत्स्ना मेश्राम या मानसिक तणावात होत्या. मानसिक तणावातूनच आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आहे.

आकस्मिक मृत्युची नोंद, तपास सुरू

नागपूर पोलिसांनी डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची शैक्षणिक कारकीर्द

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी काम पाहिलं. 25 वर्षांचा अध्यापन आणि संशोधन अनुभव त्यांना होता. मेश्राम यांनी अनेक राष्ट्रीय समिती संस्थांच्या सदस्य म्हणून काम पाहिलं होतं. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित जर्नल्समध्ये 130 पेक्षा जास्त संशोधन लेख प्रकाशित केले होते. RSC अॅडव्हान्स, जर्नल ऑफ टॉक्सिकॉलॉजी आणि ल्युमिनेसेन्स इत्यादींचा समावेश होता. 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट पदवी मिळवली होती. त्यांनी राष्ट्रीय वेबिनार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद, संगोष्ठी, कार्यशाळा मध्ये अनेक अतिथी व्याख्याने दिली आहेत. नुकताच नवी दिल्ली येथे UGC- मिड टर्म करिअर हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

इतर बातम्या:

राज्यात यांचं सरकार म्हणून कारवाई, आमचंही वर सरकार पाहून घेऊ : नारायण राणे

Vinayak Raut | नारायण राणे म्हणजे लाचारीचे महामेरु, पाय चाटून ते इथवर पोहोचले : विनायक राऊत

Jyotsna Meshram head of Rashtrasant Tukdoji Maharaj University Nagpur Committed Suicide

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI