लग्नाहून परतताना तरुणाला विचित्र अपघात, बाईक नदीच्या पुलावर, मृतदेह पुलाखाली

लग्नाहून परतताना तरुणाला विचित्र अपघात, बाईक नदीच्या पुलावर, मृतदेह पुलाखाली
भंडाऱ्यात बाईक अपघात
Image Credit source: टीव्ही 9

रुपेश काल आंधलगाव येथे आपल्या नातेवाईकाकडे लग्नाला गेला होता. कार्यक्रम आटपून आपल्या स्वगावी मेंढा गर्रा येत परत येत असताना भंडारा शहरातील वैनगंगा नदी पुलावर अपघात झाला

तेजस मोहतुरे

| Edited By: अनिश बेंद्रे

May 16, 2022 | 9:37 AM

भंडारा : लग्नाला गेलेल्या तरुणाचा विचित्र अपघातात (Bike Accident) मृत्यू झाला. 32 वर्षीय इसमाला अपघातात प्राण गमवावे लागले. ही दुःखद घटना भंडारा जिल्ह्यात (Bhandara Accident) घडली आहे. अपघातग्रस्त इसमाची दुचाकी वैनगंगा नदी पुलावर, तर मृतदेह पुलाखाली आढळून आला आहे. त्यामुळे अपघातानंतर पुलावरुन फेकला गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

रुपेश शेंडे (वय 32 वर्ष, रा. मेंढा गर्रा) असे मृतकाचे नाव आहे. रुपेश काल आंधलगाव येथे आपल्या नातेवाईकाकडे लग्नाला गेला होता. कार्यक्रम आटपून आपल्या स्वगावी मेंढा गर्रा येत परत येत असताना भंडारा शहरातील वैनगंगा नदीचा पूल ओलांडत असताना अचानक अज्ञात वाहनाने त्याचा दुचाकीला धडक दिली.

हे सुद्धा वाचा

दुचाकी पुलावर आणी रुपेश पुलाखाली

ही धडक इतकी जबर होती, की त्याची दुचाकी पुलावर आणी रुपेश पुलाखाली फेकला गेला. यात रुपेशला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. याची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली असून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें