भांडणानंतर बायकोला घरात आसरा दिल्याचा राग, कोंबडी कापण्याच्या सुरीने पतीचा शेजारणीवर हल्ला

चंद्रपूर जिल्ह्यातील बोरगावमध्ये राहणाऱ्या संघमित्र फुलाझले याचे काही दिवसांपूर्वी पत्नीशी भांडण झाले. त्यामुळे पत्नीने शेजारी राहणाऱ्या दर्शना झाडे यांच्या घरी आसरा घेतला होता. मात्र पत्नीला आसरा दिला, याचा राग संघमित्र फुलझले याला आला होता.

भांडणानंतर बायकोला घरात आसरा दिल्याचा राग, कोंबडी कापण्याच्या सुरीने पतीचा शेजारणीवर हल्ला
चंद्रपुरात तरुणाचा शेजारणीवर हल्ला

चंद्रपूर : नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे बायकोने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरी आसरा घेतला. मात्र बायकोला घरात थारा दिल्याच्या रागातून पतीने शेजारी महिलेवर प्राणघातक हल्ला केला. कोंबडी कापण्याच्या सुरीने आरोपीने शेजारणीवर भररस्त्यावर वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी अवस्थेत महिलेला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे घडली. दर्शना झाडे असे जखमी महिलेचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

चंद्रपूर जिल्ह्यातील बोरगावमध्ये राहणाऱ्या संघमित्र फुलाझले याचे काही दिवसांपूर्वी पत्नीशी भांडण झाले. त्यामुळे पत्नीने शेजारी राहणाऱ्या दर्शना झाडे यांच्या घरी आसरा घेतला होता. मात्र पत्नीला आसरा दिला, याचा राग संघमित्र फुलझले याला आला होता.

शुक्रवारी फुलझले याने चांगलीच दारु ढोसली. त्यानंतर हातात कोंबडी कापण्यासाठी वापरली जाणारी सुरी घेऊन तो गावातील रस्त्यांवर फिरत होता. रस्त्यावर जो दिसेल त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता.

मान आणि कानाजवळ सुरीने वार

त्याच वेळी दर्शना झाडे ही महिला पान टपरीजवळ आली. संघमित्र याने आधी पानपटरी मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यातून पानटपरी धारकांने स्वतःचा बचाव केला. मात्र तिथे उभी असलेली दर्शना झाडे दिसताच त्याचा राग अनावर झाला. त्याने धाव घेत दर्शना झाडेच्या मान आणि कानाजवळ सुरीने वार केले. ती रस्त्यावरच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळली.

या घटनेची माहिती गावकऱ्यांनी गोंडपिपरी पोलिसांना दिली. गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरु हे पोलीस जवानांना घेऊन घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेत असलेल्या दर्शना झाडे हिला उपचारासाठी गोंडपिपरीला हलवले. आरोपीला ताब्यात घेतले. जखमीवर ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचार सुरू आहे. पुढील तपास पीएसआय मोगरे, प्रफुल कांबळे, शामराव पूलगमकर, अमित गुरनुले, नीलरत्न उराडे, पवार करत आहेत.

नागपुरात पत्नीकडून पतीची कुऱ्हाडीने हत्या

दुसरीकडे, पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नागपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत वाद सुरु असताना संतापात पतीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला आहे. चारित्र्याच्या संश्यावरुन पती-पत्नीमध्ये सारखा वाद व्हायचा. त्यातूनच पतीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

पाणी पुरीवरुन पती-पत्नीमध्ये क्षुल्लक वाद; पत्नीचे टोकाचं पाऊल, विष प्राशन करुन आत्महत्या

पतीचा चारित्र्यावरुन संशय, दोघांमध्ये सारखा वाद, अखेर पत्नीने जे केलं त्याने नागपूर हादरलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI