विद्यार्थिनीवर अत्याचार करताना रंगेहाथ पकडलं, यवतमाळमधील ‘आदर्श शिक्षका’चे निलंबन

आरोपी अरुण राठोड हा यवतमाळमधील बेलोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता. त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला तुला नीट शिकवतो, तुला अव्वल गुण मिळतील, असं आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप आहे.

विद्यार्थिनीवर अत्याचार करताना रंगेहाथ पकडलं, यवतमाळमधील 'आदर्श शिक्षका'चे निलंबन
आरोपी शिक्षकाचे शाळेतून निलंबन


यवतमाळ : परीक्षेत चांगल्या गुणांचे आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अरुण राठोड असे निलंबित शिक्षकाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी यवतमाळमधील बेलोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याने एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती.

गावकऱ्यांनी त्याला 7 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला होता. पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं होतं. त्यानंतर सोमवारी त्याला निलंबित केल्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला

नेमकं काय घडलं?

आरोपी अरुण राठोड हा यवतमाळमधील बेलोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता. त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला तुला नीट शिकवतो, तुला अव्वल गुण मिळतील, असं आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप आहे. तो गेल्या दोन महिन्यांपासून मुलीवर अशाप्रकारे अत्याचार करत होता. अखेर गावातील तरुणांना याबाबतची कुणकुण लागली होती. त्यांनी शिक्षकाला रंगेहाथ पकडून चोप दिला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या तावडीतून शिक्षकाची सुटका करुन त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

विशेष म्हणजे आरोपी शिक्षकाला जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्याच्या घृणास्पद कृत्याने
शिक्षकी पेशाला काळिमा फासला गेल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विरोधात कमल 376 2 (N) 4, 6 पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा व्हिडीओ बघा : 

हेही वाचा :

शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल, आई-वडिलांचा आक्रोश

प्रेम केलं, प्रेयसीच्या भेटीला गेला, तिच्या कुटुंबियांनी मरेस्तोवर मारलं, प्रियकराचा करुण अंत

VIDEO : परीक्षेत चांगल्या गुणांचे आमिष देवून अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य, गावकऱ्यांकडून शिक्षकाला प्रचंड चोप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI