VIDEO : परीक्षेत चांगल्या गुणांचे आमिष देवून अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य, गावकऱ्यांकडून शिक्षकाला प्रचंड चोप

अल्पवयीन विद्यार्थीनीला परीक्षेत चांगल्या गुणांनी पास करण्याचे आमिष देऊन गेल्या दोन महिन्यांपासून शारीरीक अत्याचार करणाऱ्या नराधमाला गावकऱ्यांनी प्रचंड चोपलं.

VIDEO : परीक्षेत चांगल्या गुणांचे आमिष देवून अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य, गावकऱ्यांकडून शिक्षकाला प्रचंड चोप
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 9:57 PM

यवतमाळ : अल्पवयीन विद्यार्थीनीला परीक्षेत चांगल्या गुणांनी पास करण्याचे आमिष देऊन गेल्या दोन महिन्यांपासून शारीरीक अत्याचार करणाऱ्या नराधमाला गावकऱ्यांनी प्रचंड चोपलं. संबंधित प्रकार हा यवतमाळ तालुक्यातील बेलोरा जिल्हा परिषद शाळेत घडला. नराधम शिक्षकाला गावकऱ्यांनी आज (7 ऑगस्ट) मुलीवर अत्याचार करताना रंगेहात पकडलं. त्यानंतर त्याला प्रचंड चोप दिला. या शिक्षकाचं नाव अरुण राठोड असं आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

आरोपी हा बेलोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. त्याने अल्पवयीन विद्यार्थ्यीनीला तुला चांगलं शिकवतो, तुला अव्वल गुण मिळतील, असं आमिष दाखवत अत्याचार केला. तो गेल्या दोन महिन्यांपासून मुलीवर अशाप्रकारे अत्याचार करत होता. अखेर गावातील तरुणांना याबाबतची कुणकुण लागली होती. त्यांनी शिक्षकाला रंगेहाथ पकडून चोप दिला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या तावडीतून शिक्षकाची सूटका करुन त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

विशेष म्हणजे आरोपी शिक्षकाला जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्याच्या घृणास्पद कृत्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासली गेली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विरोधात कमल 376 2 (N) 4, 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा व्हिडीओ बघा : 

हेही वाचा :

शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल, आई-वडिलांचा आक्रोश

प्रेम केलं, प्रेयसीच्या भेटीला गेला, तिच्या कुटुंबियांनी मरेस्तोवर मारलं, प्रियकराचा करुण अंत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.