नागपूर: राजकीय नेत्यांचे सोशल मीडिया अकाऊंटस हॅक करण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतं आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. फेसबुक व ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची सकाळी माहिती पुढे आली. टर्किश सेक्युरिटी आर्मी नावाचा उल्लेख त्यात दिसून येत आहे …नागपूर सायबर सेल कडे खासदार तुमाने यांनी तक्रार दाखल केली.