भयान आणि भीषण, बुलडाण्यात खरतनाक अपघात, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, 18 प्रवासी जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बायपासवर एसटी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. बसमधील 18 प्रवासी जखमी झाले आहेत.

भयान आणि भीषण, बुलडाण्यात खरतनाक अपघात, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, 18 प्रवासी जखमी
बुलडाण्यात खरतनाक अपघात, वृद्ध आजीचा जागीच मृत्यू

बुलडाणा : यवतमाळच्या बस डेपोतून आज (23 ऑगस्ट) सकाळी औरंगाबादच्या दिशेला एसटी निघाली. एसटीत जवळपास 25 प्रवासी बसले होते. नुकताच काल रक्षाबंधन सण पार पडला. त्यामुळे पाहुणेमंडळी आपापल्या घरी जाण्यासाठी निघाली होती. तर कुणी वैयक्तिक कामानिमित्त बाहेर निघाले होते. यवतमाळहून औरंगाबादला एसटीने प्रवास करणारे असे अनेक प्रवासी होते. प्रत्येकाच्या मनात औरंगाबादला पोहोचल्यानंतर त्यांना हव्या त्या ठिकाणी जाण्याचा विचार ते करत असतील. वेगवेगळं नियोजन आखत असतील. पण अनपेक्षित अशी घटना घडली. यवतमाळमधून औरंगाबादला निघालेल्या बसचा बुलडाण्यात देऊळगाव राजा बायपास मार्गावर भीषण अपघात घडला. एका ट्रकने या बसला धडक दिली. त्यामुळे बसच्या काही भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात एका वृद्ध आजीचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्य

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बायपासवर एसटी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. बसमधील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. ट्रक आणि बस यांच्या अपघाताचा आवाजही मोठा आला. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्गाने जाणारे अनेकजण घटनास्थळी थांबले.

6 प्रवाशी गंभीर जखमी

स्थानिक नागरिकांनी तातडीने वेळेचा विलंब न करता पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच नागरिकांनी बसमधील नागरिकांना बाहेर काढायला सुरुवात केली. यावेळी एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. नागरिकांनी सर्व जखमींना तातडीने देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. या दुर्घटनेत 18 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी 6 प्रवासी हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुलडाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव-दुसरबिडमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला होता. समृद्धी हायवेच्या कामासाठी दुसरबीड येथे मजूर घेऊन हा टेम्पो जात होता. यादरम्यान तळेगाव येथे हा गंभीर अपघात झाला. समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूर परप्रांतीय असल्याचं समोर आलं होतं. ट्रकमध्ये एकूण 17 ते 18 मजूर होते. या मजुरांपैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले.

हेही वाचा :

मुंबईत भाजी विक्रेत्याला मारहाण CCTV मध्ये कैद, तिघांना बेड्या

आई-बहिणीला इंजेक्शन देऊन संपवलं, आत्महत्येचा प्रयत्न करणारी 30 वर्षीय डॉक्टर बचावली

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI