Nagpur Crime : नागपुरात चोरी केली पळून गेले, महिलेनं फोन करून भेटायला बोलावले, चोर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

एका महिला पोलीस शिपायाने आरोपीशी मोबाईलवर संपर्क साधला. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. आपल्या जाळ्यात नवी प्रेयसी मिळाल्यासारखं अंकेशला वाटलं. तो देहभान विसरून महिलेशी बोलत होता. त्याला याची कल्पना नव्हती की, ती पोलीस आहे. महिला पोलीस शिपायाने अंकेशला लोकमान्यनगर मेट्रो स्थानकावर भेटायला बोलावले. अंकेश तिला भेटायला तिथं आला. साध्या वेशात पोलीस हजर होते.

Nagpur Crime : नागपुरात चोरी केली पळून गेले, महिलेनं फोन करून भेटायला बोलावले, चोर अडकले पोलिसांच्या जाळ्यात
महिलेनं फोन करून भेटायला बोलावले, चोर अडकले पोलिसांच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 2:45 PM

नागपूर : आरोपी हा कितीही शातीर असला तरी कधी ना कधी तरी सापडतोच. अशीच घटना नागपुरात घडली. सहकारनगर (Sahakarnagar) येथील संजय रतनकुमार चौधरी (वय 53) यांची कंपनी आहे. आरोपींनी त्यांच्या कंपनीकडून (Company) लाखो रुपयांच्या मालाची चोरी केली होती. अंकेश रामसिंह पाल (Ankesh Pal) व त्याच्या सहकाऱ्याने ही चोरी केली असावी असा पोलिसांना संशय होता. पोलीस आरोपींच्या मागावर होते. पोलिसांनी आरोपींची गुप्त माहिती काढली. आरोपी अंकेश त्याच्या दोन गर्लफ्रेण्डसोबत नेहमी बोलत असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी त्याच्या या कमजोरीचा फायदा घेतला. पोलिसांनी वेश बदलून सापळा रचला. आरोपी हा योजनेनुसार जाळ्यात अडकला.

महिला पोलिसानं अशी केली युक्ती

एका महिला पोलीस शिपायाने आरोपीशी मोबाईलवर संपर्क साधला. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. आपल्या जाळ्यात नवी प्रेयसी मिळाल्यासारखं अंकेशला वाटलं. तो देहभान विसरून महिलेशी बोलत होता. त्याला याची कल्पना नव्हती की, ती पोलीस आहे. महिला पोलीस शिपायाने अंकेशला लोकमान्यनगर मेट्रो स्थानकावर भेटायला बोलावले. अंकेश तिला भेटायला तिथं आला. साध्या वेशात पोलीस हजर होते. संधी बघून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अंकेशकडून 97 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या कारवाईनंतर एमआयडीसी पोलिसांसह महिला शिपायावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चोराची कमजोरी शोधली

चोराला महिलांशी बोलायला आवडत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तो त्याच्या दोन मैत्रिणींसोबत नेहमी बोलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. एक महिला पोलिसानं त्याला फोन केला. त्याच्याशी मैत्रिणीप्रमाण बोलू लागली. तीचं बोलणं ऐकून तो भाळला गेला. तीन त्याला फोनवरून लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनवर भेटायला बोलावले. तो मोठ्या आशेनं तिला भेटायला आला. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशी केल्यानंतर चोरी केली असल्याची कबुली त्यानं दिली. त्याच्यासोबत त्याचा दुसरा अल्पवयीन मुलगाही होता. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.