पाणी रिसायकलिंग पॉवर स्टेशनमध्ये कुजलेला मृतदेह, परिसरात एकच खळबळ, नागपुरात नेमकं काय घडलं?

नागपूर शहरात हत्येचं सत्र सुरुच आहे. नागपूरच्या हिवरी नगर परिसरात आज अनोळखी इसमाचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे.

पाणी रिसायकलिंग पॉवर स्टेशनमध्ये कुजलेला मृतदेह, परिसरात एकच खळबळ, नागपुरात नेमकं काय घडलं?
फोटो प्रातनिधिक
सुनील ढगे

| Edited By: चेतन पाटील

Jul 30, 2021 | 6:07 PM

नागपूर : नागपूर शहरात हत्येचं सत्र सुरुच आहे. नागपूरच्या हिवरी नगर परिसरात आज अनोळखी इसमाचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह आठ ते दहा दिवस जुना असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

नागपूर शहरातील हिवरी नगर येथे दूषित पाणी रिसायकलिंग पॉवर स्टेशन आहे. या पॉवर स्टेशनवर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. मृतदेह आढळल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी दाखल झाली. या घटनेबाबत पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलिसांनी वेळेचा विलंब न करता तातडीने घटनास्थळ गाठलं. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांना तपासासाठी मोठे आव्हान

संबंधित मृतदेह हा नाल्यात वाहून आल्याचं बोललं जात आहे. मृतक व्यतीचं वय 35 वर्ष असावं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने या व्यक्तीची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांना आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. संबंधित मृतदेह नेमका कुणाचा आहे. त्याची हत्या झाली की घातपात? मृतदेह रिसायकलिंग पॉवर स्टेशनपर्यंत कसा पोहोचला, या सगळ्यांचा तपास पोलीस करत आहेत.

नागपुरात वारंवार हत्येच्या घटना

नागपुरातील गुन्हेगारी ही संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. नागपुरात गुन्हा घडण्यासाठी किंवा हत्येलासाठी फारसं विशेष कारण लागत नाही. अगदी क्षुल्लक कारणावरुन नागपुरात हत्येच्या घटना घडतात. काही दिवसांपूर्वी नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकामागून एक अशी दोन हत्याकांडं समोर आली होती. विशेष म्हणजे एका हत्येचा बदला घेण्यासाठी अवघ्या काही तासात दुसऱ्याची हत्या करण्यात आली. 21 वर्षीय युवकाच्या हत्येनंतर त्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मारहाण करत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आली.

आधी 21 वर्षीय युवकाचा खून

कौशल्या नगर परिसरात स्वयंदीप नगराळे नावाच्या 21 वर्षीय युवकाचा खून झाला. परिसरातील 7 ते 8 युवकांकडून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेत अजनी पोलिसांनी तात्काळ 3 आरोपींना अटक केली, मात्र या खुनातील मुख्य आरोपी शक्तिमान गुरुदेव हा फरार होता.

नंतर मुख्य आरोपीची हत्या

परिसरातील काही युवकांना शक्तिमान हा भांडे प्लॉट चौकाजवळ आपल्या नातेवाईकाच्या घरी लपून असल्याची माहिती मिळाली. त्यासोबतच त्यांनी शक्तिमानला पकडून कौशल्या नगर परिसरात आणले आणि त्याला मारहाण करत त्याची दगडाने ठेचून हत्या केली.

स्वयंदीपचा खून कसा झाला?

21 वर्षीय स्वयंदीप नगराळे हा रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर असलेल्या ऑटोमध्ये बसला होता. त्यावेळी त्याच्यावर 7 युवकांकडून शस्त्रानिशी हल्ला करण्यात आला. त्यात स्वयंदीपचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली.

दुसऱ्याच दिवशी (शनिवारी) सकाळी आरोपी शक्तिमानचा देखील दगडाने ठेचून खून झाला. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी शक्तिमानचा परिसरात दबदबा होता आणि त्याच्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते, तर काही ठिकाणी अवैध जुगार अड्डा या हत्येच्या मागचे खरं कारण असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

भाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं

दारुड्यांचा धिंगाणा, विरोध करणाऱ्या युवकाला शिवीगाळ, नंतर गोळ्या झाडल्या

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें