बोअरवेलमध्ये बाळ पडलं, टॉर्च लावून दोरी सोडली, गावकऱ्यांनी अशक्य गोष्ट करुन दाखवली

शिवारात खेळत असताना दोन वर्षाचं बाळ बोअरवेलमध्ये पडलं. त्यानंतर बाळाच्या आई-वडिलांनी बोअरवेलजवळ हंबरडा फोडला (villagers save life of child who fell into the borewell in Nagpur).

बोअरवेलमध्ये बाळ पडलं, टॉर्च लावून दोरी सोडली, गावकऱ्यांनी अशक्य गोष्ट करुन दाखवली
बोअरवेलमध्ये बाळ पडलं, टॉर्च लावून दोरी सोडली, गावकऱ्यांनी अशक्य गोष्ट करुन दाखवली

नागपूर : रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. शिवारात खेळत असताना दोन वर्षाचं बाळ बोअरवेलमध्ये पडलं. त्यानंतर बाळाच्या आई-वडिलांनी बोअरवेलजवळ हंबरडा फोडला. त्यानंतर आख्खं गाव घटनास्थळी दाखल झालं. बाळाच्या आई-वडिलांनी हिंमत हारली तरी गावकऱ्यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी प्रसंगावधान साधून तातडीने प्रयत्न सुरु केले. विशेष म्हणजे प्रशासन घटनास्थळावर पोहचण्याआधीच गावकऱ्यांनी त्या बाळास मोठ्या शिताफीने सुखरूप बाहेर काढले. नवघान देवा दोंडा असे त्या बाळाचे नाव आहे (villagers save life of child who fell into the borewell in Nagpur).

नेमकं काय घडलं?

नवघानचे वडील शिवारात जनावरे चारत होते. त्यांच्या बरोबरच त्यांचे मुलं देखील शिवारात आले होते. ते तिथे खेळत होते. नवघान खेळता खेळता शेतातील एका बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. इतर मुले रडत होती. मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून वडील घटनास्थळी पोहचले. आईवडिलांचा हंबरडा ऐकून गावातील लोकं घटनास्थळी दाखल झाले. जवळपास अर्ध्या तासापासून ते बाळ तिथे पडून होते (villagers save life of child who fell into the borewell in Nagpur).

गावकऱ्यांचा टॉर्च लावून बाळाशी संपर्क

गावातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. बोअरवेलला पाणी न लागल्याने शेतकऱ्याने तो खड्डा तसाच उघडा ठेवला होता. बाळास बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी सर्वात आधी टॉर्च लावून बाळाशी संपर्क साधला. पन्नास फुट खोलवर असलेल्या बोअरवेलच्या खड्ड्यात दोर (रस्सी) टाकला. बाळास रस्सीला हात पकडण्यास सांगितले. आणि मोठ्या शिताफीने बाळास सुखरूप बाहेर काढले.

अखेर बाळाला वाचवण्यात गावकऱ्यांना यश

अर्धा तास शर्थीचे प्रयत्न चालले. याबाबतची कल्पना प्रशासनास नव्हती . मात्र गावकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने हा थरार प्रसंग केला. जेसीबी येण्यास उशीर झाला. अखेर मोठ्या दिमतीने बाळास सुखरूप बाहेर काढण्यास यश आले. हे गाव मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रच्या सीमेवर दुर्गम भागात आहे.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भाऊ असल्याचं खोटं सांगून अनेकांना लाखोंचा गंडा, अखेर आरोपींना कर्नाटकातून बेड्या

रात्री मित्रांबरोबर दारु पार्टी, सकाळी बलात्काराचा आरोप करुन तरुणीची आत्महत्या!