AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भाऊ असल्याचं खोटं सांगून अनेकांना लाखोंचा गंडा, अखेर आरोपींना कर्नाटकातून बेड्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नातेवाईक असल्याच्या थापा मारुन अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पिता-पूत्राला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत (Police arrest fraudsters pretending to be relatives of Union minister Nitin Gadkari)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भाऊ असल्याचं खोटं सांगून अनेकांना लाखोंचा गंडा, अखेर आरोपींना कर्नाटकातून बेड्या
महाराष्ट्र पोलिसांची बेधडक कारवाई, ,नितीन गडकरींचा नातेवाईक असल्याचे सांगून फसवणाऱ्यांना कर्नाटकातून बेड्या
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 3:35 PM
Share

कल्याण (पूर्व) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नातेवाईक असल्याच्या थापा मारुन अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पिता-पूत्राला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजन गडकरी आणि आनंद गडकरी अशी आरोपींची नावे आहेत. डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी आरोपींना कर्नाटकातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी अनेकांची सोने स्वस्त दरात देतो म्हणून फसवणूक केली. तर कुणाला नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे आरोपींनी घरातल्या सूनेवर गुन्ह्यांचा आळ घातला. त्यानंतर तिच्या मुलाला म्हणजे नातवाला घेऊन ते पळून गेले. अखेर महिलेने आपल्या पती आणि सासऱ्याविरोधात बंड पुकारत पोलिसांना सर्व माहिती दिली (Police arrest fraudsters pretending to be relatives of Union minister Nitin Gadkari)

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या अनेक जणांनी नोकरी लावण्याच्या नावाखाली तसेच स्वस्त भावात सोने घेऊन देण्याच्या नावाखाली राजन गडकरी आणि त्याचा मुलगा आनंद गडकरी यांना लाखो रुपये दिले. पण कुणालाच नोकरी लागली नाही आणि सोनेही मिळाले नाही. भाऊ नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत, असे सांगून गडकरी आडनावाचा फायदा घेत हे पैसे उकळले जात होते. मात्र, त्यांची लबाडी फार काळ टिकली नाही (Police arrest fraudsters pretending to be relatives of Union minister Nitin Gadkari).

आरोपी सूनेला सोडून सहकुटुंब पळाले

लोकांना जेव्हा माहिती पडले की त्यांची फसवणूक झाली, तेव्हा त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. तेव्हा राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी, राजनची पत्नी आणि आनंदच्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन पसार झाले. पण ते आनंदची पत्नी गीतांजली गडकरी हीला सोबत घेऊन गेले नाहीत. आपल्या मुलाला आपल्याशी तोडून हे पळून गेल्याने गीतांजलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कारण तिच्याच बँक खात्यातून तिचा पती आणि सासऱ्याने सर्व व्यव्हार केले होते.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी फसवणूक झालेल्या अमोल पलसमकर यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गीतांजली हिच्या कबुली जबाबानुसार ती माफीची साक्षीदार झाली. तिने  सासरे आणि पतीचे सगळे कटकारस्थान पोलिसांना सांगितले. तिने फसवणुकी संदर्भात आपल्याला काही एक माहित नसल्याचा जबाब पोलिसांकडे दिला. फक्त मला माझा चार वर्षाचा मुलगा परत आणून द्या. या आरोपींना लवकरात लवकर शोधा, अशी मागणी सून गीतांजली गडकरीने केली होती. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांचे दोन पथक तपासासाठी रवाना झाले होते.

हेही वाचा : ठाण्यात मोबाईल चोरट्यांची इतकी हिंमत? चालत्या रिक्षेतल्या महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न, निष्पाप महिलेला मृत्यू

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.