AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Murder : साडूसोबत दारु पिताय? दारुत विष कालवून साडूची हत्या, प्रॉपर्टीच्या वाटणीसाठी रचलं हत्याकांड

Wardha crime News : हिस्से वाटणीच्या वादातून मारेश्वर पिंपळे या व्यक्तीला त्यांच्याच साडभाऊ संदीप पिंपळे यांने दारु पाजली होती. दारुतून मोरेश्ववर याला विष देण्यात आलं. मोरेश्वर जुनगड इथं राहायला होते. तर संदीप हे कान्होलीबारा इथं राहायला होते.

Wardha Murder : साडूसोबत दारु पिताय? दारुत विष कालवून साडूची हत्या, प्रॉपर्टीच्या वाटणीसाठी रचलं हत्याकांड
वर्ध्यातील खळबळजनक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 1:52 PM
Share

वर्धा : साडभावाची हत्या (Wardha Murder News) केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात (Wardha Crime) समोर आली आहे. प्रॉपर्टीसाठी ही हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. दारुमध्ये विष (Poison in alcohol) कालवून ही हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी हत्या करण्यात आलेल्याच्या साडभावासोबत अन्य दोघांनाही अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जातेय. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात हे हत्याकांड घडलं. साडू साडू म्हणून ज्याला मिरवलं होतं, त्याचीची हत्या करण्यात आल्यानं सेलू तालुका हादरलाय. दारु पिऊन जागच्या जागी कोसळलेल्या व्यक्तीला रुग्णालयातही उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथं डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषित केलंय. अखेर पोलिसांनी तपास केला असता, विष देत या व्यक्तीची हत्या करण्यात आली असल्याचं उघड झालं. त्यानंतर साडभावानेच हे हत्याकांड रचल्याचाही खुलासा पोलिसांच्या तपासातून झाला आहे.

नेमकं काय प्रकरण?

हिस्से वाटणीच्या वादातून मारेश्वर पिंपळे या व्यक्तीला त्यांच्याच साडभाऊ संदीप पिंपळे यांने दारु पाजली होती. दारुतून मोरेश्ववर याला विष देण्यात आलं. मोरेश्वर जुनगड इथं राहायला होते. तर संदीप हे कान्होलीबारा इथं राहायला होते. मोरेश्वर पिंपळे यांने दारु प्यायली होती. त्यानंतर काळी वेळात मोरेश्वर जमिनीवर कोसळले होते. अखेर सेवाग्राम रुग्णालयात तब्बेत बिघडली म्हणून मोरेश्वरला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तिथे डॉक्टरांनी मोरेश्वर याला मृत घोषित केल्यानं पिंपळे कुटुंबीयांना धक्काच बसला.

कळलं कसं?

या घटनेप्रकरणी सेलू पोलील अधिक तपास करत होते. दरम्यान, घटनास्थळी पाहणी करताना घातपाताचा संशय आल्यान सेलू पोलिसांनी कसून चौकशी केली. पोलिसांनी संदिप पिंपळे यास ताब्यात घेत चौकशी केली असता हिस्से वाटणीच्या कारणातून विष देऊन हत्या केल्याच पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूची बाटली जप्त केली. त्याचप्रमाणे संदीपसह विजयसिंह चीतोडिया, राजकुमार चीतोडिया या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. 18 ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार करण्यात आला होता. एसडीपीओ पियुष जगपात यांनी याबाबतची माहिती दिलीय.

संदीप पिंपळे याने या दोघांकडून उपचारासाठी काही औषधं आणि जडीबुटी घेतल्या होत्या. त्यामुळं संपर्कातून झालेल्या ओळखीतून त्यानं विष घेतल्याचं पोलिसांच्या तपासात पुढ आलंय. हत्याकांडाच्या या घटनेनं वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.