AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांसह सावत्र आईकडून चिमुकल्यांचा छळ, अमानुष मारहाण, निर्दयी आई-वडिलांवर गुन्हा

सख्खा वडिलासह सावत्र आईनं चिमुकल्यांना निर्दयपणे मारहाणं केलीये. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात ही घटना घडलीय. चिमुकल्यांचा अमानुष छळ करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली (Wardha Two Minor Children Get Beaten Brutally From Father And Step Mom Police Arrested Them).

वडिलांसह सावत्र आईकडून चिमुकल्यांचा छळ, अमानुष मारहाण, निर्दयी आई-वडिलांवर गुन्हा
महिला व बाल कल्याण विभाग टीम
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 7:11 AM
Share

वर्धा : लडिवाळ करत गोंजारल्या जाणाऱ्या चिमुकल्यांवर हात उगरण्याचीही गरज नसते. तिथं सख्खा वडिलासह सावत्र आईनं चिमुकल्यांना निर्दयपणे मारहाणं केलीये. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात ही घटना घडलीय. चिमुकल्यांचा अमानुष छळ करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली (Wardha Two Minor Children Get Beaten Brutally From Father And Step Mom Police Arrested Them).

दोन दिवसांपूर्वी चाईल्डलाईनच्या 1098 हेल्पलाईनवर दोन लहान बहिण भावांचा वडील आणि सावत्र आईकडून छळ होत असल्याची तक्रार मिळाली. त्यावरुन चाईल्ड हेल्प लाईनच्या चमूने आर्वी तालुक्यातील गाव गाठलं. चिमुकल्यांची वडील आणि आईच्या ताब्यातून सोडवणूक करत पोलिसांत तक्रार केली.

सुरुवातीला या प्रकरणात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुलांना केलेली मारहाण पाहता कलमात वाढ करत कलम 307 सुद्धा लावण्यात आलंय. मुलाचं वय 8 तर मुलीचं वय 11 वर्ष असल्याच सांगण्यात आलंय. चिमुकल्यांचा झालेला छळ मन सुन्न करणारा आहे. मागील काही वर्षांत त्यांना सातत्यान मारहाण झालीये. त्यांच्या शरीरावरील जखमा अत्याचाराची अमानुष कहाणी सांगणाऱ्या आहेत. चिमुकल्यांना जंगलात सोडण्याचा निदर्यीपणाही केला गेला.

सध्या दोन्ही मुले हे वर्धेच्या बालगृहात आहेत. यांचं येथे समुपदेशन करत त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या बालगृहात जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देत मुलांची विचारपूस केलीय.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत मुलांचे वडील अन सावत्र आईला अटक केलीये.

Wardha Two Minor Children Get Beaten Brutally From Father And Step Mom Police Arrested Them

संबंधित बातम्या :

सोशल मीडियावर मैत्री, नंतर प्रेमविवाह, आठ महिन्यांची मुलगी, तरीही जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडीदाराने पत्नीला का संपवलं?

पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी भोवली, पोलिसाकडून सासऱ्यांची गोळी झाडून हत्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.