भावालाही मुलगी झाली, आपल्या लेकीचे लाड कोण करणार? यवतमाळमध्ये नणंदेने वहिनीला जाळले

पहिल्या मुलानंतर गणेश पवारला मुलगी झाली, मात्र भावाला मुलगी झाल्याने, माहेरी आता आपल्या मुलीचे लाड होणार नाहीत, या कारणामुळे आरोपी नणंद कांता संजय राठोड चरफडत होती

भावालाही मुलगी झाली, आपल्या लेकीचे लाड कोण करणार? यवतमाळमध्ये नणंदेने वहिनीला जाळले
नणंदेने वहिनीला जिवंत जाळून मारले
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 8:44 PM

यवतमाळ : अंगावर तेल फेकून विवाहितेची जाळून हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळमध्ये समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेच्या नणंदेनेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. भावालाही मुलगी झाल्यामुळे आता माहेरी आपल्या लेकीचे लाड कोण करणार? या असूयेच्या भावनेने नणंदेने वहिनीला जाळल्याचा आरोप केला जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील दातपडी गावात ही घटना घडली. विवाहितेच्या अंगावर तेल टाकून तिला जाळून मारल्याचा प्रकार समोर आला आहे. मोनिका गणेश पवार असे मयत महिलेचे नाव आहे. मोनिकाच्या नणंदेनेच तिची हत्या केली.

नेमकं काय घडलं?

पहिल्या मुलानंतर गणेश पवारला मुलगी झाली, मात्र भावाला मुलगी झाल्याने, माहेरी आता आपल्या मुलीचे लाड होणार नाहीत, या कारणामुळे आरोपी नणंद कांता संजय राठोड चरफडत होती. त्यामुळेच तिने तेल टाकून वहिनीला जाळून मारले, अशी तक्रार महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. पांढरकवडा पोलिसांनी नणंद कांता राठोड हिच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा पूर्ण घटनाक्रम

मृतक मोनिका गणेश पवार यांनी 4 जुलैला एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याआधी तिला एक मुलगा सुद्धा आहे. कुटुंब मुलगी झाल्याच्या आनंदात असताना मुलीच्या आत्याला म्हणजे मृतक महिलेच्या नणंदला मुलगी झाल्याचे सुख पचत नव्हते. कांता राठोड हिने या विषयावरून मृतक महिलेसोबत वाद घातला. मात्र ती बाळंतीन असल्याने तिने भांडणाकडे दुर्लक्ष केले.

वादानंतर थोड्यावळाने मृतक मोनिका या बाथरूममझ्ये गेल्या. यावेळी नणंद कांता हिने मोनिका यांच्या अंगावर ऑईल टाकून पेठवून दिले. त्यात मृतक मोनिका या 80 टक्के जळल्या. दरम्यान जळालेल्या मोनिकाला उशिरा उपचारसाठी सेवाग्राम येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र 17 जुलैच्या रात्री तिने अखरेचा श्वास घेतला. मोनिकाला एक चार वर्षाचा मुलगा असून 14 दिवसाची मुलगी सुद्धा आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलिसांनी 302 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं !

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

(yavatmal Sister in Law kills brother’s wife out of envy after lady gave birth to girl child)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.