भाऊ पडला लिव्ह इन पार्टनरच्या प्रेमात, ‘गब्बर’ने बेडरूममध्ये रंगेहात पकडलं आणि….

दोन भाऊ एकाच महिलेच्या प्रेमात पडले, पण त्यामुळे त्यांच संपूर्ण आयुष्यच पालटलं. त्या दिवशी जे झालं त्याने....

भाऊ पडला लिव्ह इन पार्टनरच्या प्रेमात, 'गब्बर'ने बेडरूममध्ये रंगेहात पकडलं आणि....
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 12:05 PM

नागपूर | 2 नोव्हेंबर 2023 : नागपूर शहरात लव्ह ट्रँगलचा भयानक अंत झाला. या प्रेमकहाणीमध्ये दोन चुलत भावांपैकी एक महिलेच्या बेडवर मृतावस्थेत आढळला तर दुसऱ्याला हत्येच्या आरोपाखाली तुरूंगात धाडण्यात आलं. हे दोन्ही भाऊ एका ३५ वर्षांच्या महिलेच्या प्रेमात पडले होते. ती त्यांच्यापैकी एका भावासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये होती.

पण या हत्येने दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली. ही महिला राजेश चव्हाण उर्फ गब्ब याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती आणि तिने दोन मुलांनाही जन्म दिला. तर रोहनबाग हाही दोन मुलांचा पिता होता आणि तो नुकताच गब्बरच्या लिव्ह-इन पार्टनरच्या प्रेमात पडला होता. आपलाच चुलतभाऊ असलेल्या नितीन रोहनबागची हत्या करण्यासाठी गब्बरने दोन पुतण्यांचीही मदत घेतली.

१२ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनमध्ये होता गब्बर

मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येच्या अवघ्या २४ तासांआधीच पोलिसांनी गब्बरला वॉर्निंग दिली होती. त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये असलेल्या महिलेने मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई त्याला वॉर्निंग दिली. पण त दिवस संपायच्या आधीच गब्बनने त्याच्या चुलतभावाचा, रोहनबागचा जीव घेतला, असे पोलिसांनी सांगितले. पहिल्या पत्नीपासून दूर झाल्यानंतर गेल्या १२ वर्षापासून गब्बर त्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये होता.

पण त्याचा चुलतभाऊ रोहनबाग हाही त्याच्या लिव्ह-इन पार्टनच्या प्रेमात पडला, त्यामुळे दोन्ही भावांमध्ये वैमनस्य आले, अनेकवेळा भांडणंही झाली. यामुळे गब्बर संतापला आणि त्याचा राग त्या महिलेवर निघाला.

असा पडला प्रेमात

आपलं सामान नव्या घरात शिफ्ट करण्यासाठी गब्बरने रोहनबागची मदत मागितली आणि तेव्हापासूनच तो त्याच्या लिव्ह-इन पार्टनरच्या प्रेमात पडला, त्यांची जवळीकही वाढली. घर लावण्याच्या बहाण्याने रोहनबाग काही दिवस त्यांच्याच घरात राहिला. पण गब्बरला त्याच्यावर संशय येऊ लागला आणि त्याचे लिव्ह-इन पार्टनरशी खटके उडू लागले. तेव्हापासून तो पहिल्या पत्नीलाही भेटायला जाऊ लागला.

तर दुसरीकडे रोहनबागच्या पत्नीलाही त्याच्यावर संशय येऊ लागला. त्याच्या अवैध संबंधाबद्दल कळल्यावर तिने त्याची समजूत काढून घरी बोलावण्याचा प्रयत्न केला.

अखेर संतापलेल्या गब्बरने त्याच्या चुलतभावाला संपवण्यासाठी आणखी एका भावाची आणि पुतण्याची मदत घ्यायचे ठरवले. त्या दोघांसोबत तो घरी गेला, तेव्हा रोहनबागची बाईक घराबाहेरच पार्क केलेली होती. दार वाजवून तो आत घुसला आणि रोहबागला आत पाहून भडकलाच. दोघांमध्येही वाद सुरू झाला आणि त्याचं हाणामारीत रुपांतर झालं. दोघंही एकमेकांशी भांडत होते, मारत होते. त्यानंतर गब्बरने एक चाकू काढून रोहबागच्या शरीरात खुपसला आणि त्याचा जीव जाईपर्यंत तो वार करतच राहिला. हे पाहून त्याची लिव्ह-इन पार्टनर घाबरली आणि तिने पोलिसांत जाऊन सगळा प्रकार कथन केला.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून गब्बरसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. रोहनबागचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. एका महिलेच्या प्रेमामुळे दोन भावांमधलं वैर तर तापलंच पण दोन कुटुंबही उद्ध्वस्त झाली.

Non Stop LIVE Update
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.