ढोंगी बाबानं पीडितेला बनवलं वासनांधतेचा शिकार, दीड वर्ष सातत्यानं अत्याचार

मुस्लिम बाबाला त्याच्या पत्नीपासून पाच मुलं आहेत. मंञाने आणि मंतरलेल्या ताविजने आपण लोकांना बरं करतो असा कांगावा करत तो लोकांना फसवायचा. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे राहणारी एक 23 वर्षीय युवती या अशा ढोंगी बाबाची शिकार झाली. पीडित युवतीची बहीण ही मिरा रोड येथे राहते.

ढोंगी बाबानं पीडितेला बनवलं वासनांधतेचा शिकार, दीड वर्ष सातत्यानं अत्याचार

नालासोपाराः पाच मुलांच्या ढोंगी बाबाने आजार बरा करतो सांगत एका पीडितेला आपला वासनांधतेचा शिकार बनवलंय. तिचं धर्मपरिवर्तन करून तिच्याशी लग्नसुद्धा केलंय. तिच्यावर तो जवळपास दीड वर्ष अत्याचार करत राहिला. पीडितेच्या घरच्यांकडे हा ढोंगी बाबा आपल्या ड्रायव्हरला तिचा पती म्हणून पुढे करायचा. मात्र पीडितेच्या मोठ्या बहिणीने एका एनजीओला गाठून बाबाचं पितळं उघडं पाडलंय. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यात बाबासह बाबाला मदत करणा-या त्याच्या पत्नीवर तसेच त्याचा सहकारी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी बाबालाच फक्त अटक केलीय.

23 वर्षीय युवती या अशा ढोंगी बाबाची शिकार

मुस्लिम बाबाला त्याच्या पत्नीपासून पाच मुलं आहेत. मंञाने आणि मंतरलेल्या ताविजने आपण लोकांना बरं करतो असा कांगावा करत तो लोकांना फसवायचा. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे राहणारी एक 23 वर्षीय युवती या अशा ढोंगी बाबाची शिकार झाली. पीडित युवतीची बहीण ही मिरा रोड येथे राहते. तिची तब्येत बरी नसल्याने तिने या बाबाकडे झाडपाल्याच औषध आणि मंतरेलेलं ताविज घेतलं आणि तिला बरं वाटलं. तिने आपल्या वाराणसीला राहणाऱ्या बहिणीला अशीच तब्येत खराब राहत असल्याने बाबाचा नंबर दिला. मग काय बाबा आणि तिच्या पत्नीने आपल्या बोलबच्चनमध्ये फसवून तिला उपचारासाठी नालासोपारा येण्यास सांगितले. तिला चक्क विमानाची तिकीटही पाठवून दिली.

ड्रायव्हर स्वतः तिला घ्यायला एअरपोर्टवरही गेले

बाबा, बाबाची पत्नी आणि ड्रायव्हर स्वतः तिला घ्यायला एअरपोर्टवरही गेले. पीडित 26 जून 2020 ला नालासोपाराला बाबाच्या घरी आली. माञ बाबाने आपली वेगळीच नियत तिला दाखवली. बाबा, बाबाची पत्नी, त्याचा ड्रायव्हर आणि बाबाची पाच मुले अशी एकाच रुममध्ये राहू लागली. बाबा पीडितेला उपचाराच्या नावाखाली गुंगीचे औषध द्यायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. पीडितेने ही बाब बाबाच्या पत्नीला सांगितल्यावर पत्नीने पीडितेलाच धमकी दिली. पीडितेच्या घरच्यांना बाबांने मुलीने माझ्या ड्रायव्हरबरोबर लग्न केलं असून, ती खूश असल्याच खोटं सांगितलं.

पीडितेच्या घरच्यांना आपल्या ड्रायव्हरने लग्न केल्याचं तो सांगायचा

ढोंगी बाबाने पीडितेचे धर्म परिवर्तन केलं. त्यानंतर तिच्याबरोबर लग्नही केलं. मात्र पीडितेच्या घरच्यांना आपल्या ड्रायव्हरने लग्न केल्याचं तो सांगायचा. आई आजारी असल्याचं सांगून पीडितेने वाराणसी गाठली आणि आपल्या मिरा रोड येथील बहिणीला सगळा प्रकार सांगितला. पीडितेच्या बहिणीने मिरा रोड येथील एनजीओना गाठून तुळींज पोलीस ठाण्यात बाबाविरोधात गुन्हा दाखल केला.

ड्रायव्हरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

पीडितेच्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात बाबा, बाबाची पत्नी आणि ड्रायव्हरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तुळींज पोलिसांनी बाबाला अटक केली, तर बाबाची पत्नी आणि त्याचा ड्रायव्हर यांना अजून अटक केलेली नाही. मात्र याबाबत पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. तुळींज पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलासह इतर नगरसेवकांविरोधात अपात्रतेची टांगती तलवार

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच धारदार शस्त्राने हल्ला, बीडमध्ये कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

nalasopara Hypocritical baba made the victim a girls of lust, outrage for a year and a half

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI