AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाईकस्वाराला वाटेत अडवून अपहरण, मारहाणीनंतर दहा लाखांची खंडणी वसुली

बंदुकीचा धाक दाखवून खंडणीसाठी येळेगाव साखर कारखाना रोडवर कस्तुरकर यांना तब्बल पाच तास जबर मारहाण करण्यात आली.

बाईकस्वाराला वाटेत अडवून अपहरण, मारहाणीनंतर दहा लाखांची खंडणी वसुली
तक्रारदार नंदकिशोर कस्तूरकर
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 12:40 PM
Share

नांदेड : दुचाकीस्वार व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. रात्रभर बेदम मारहाण करत त्याच्याकडून 10 लाख रुपयांची खंडणी घेऊन सोडून दिले. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. (Nanded Bike Rider allegedly beaten up extortion after Kidnapping)

कारमधील पाच जणांकडून अपहरण

नांदेड जिल्ह्यातील इतवारा भागातील रहिवासी असलेले नंदकिशोर कस्तूरकर हे 10 जून रोजी रात्री आपल्या मित्रासोबत जेवण करण्यासाठी अर्धापुर येथे गेले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कस्तूरकर हे दुचाकीवर परत घरी निघाले. यावेळी पाठीमागून कारमधून आलेल्या पाच अज्ञात आरोपींनी कस्तूरकर यांना अडवलं.

बंदुकीच्या धाकाने मारहाण

बंदुकीचा धाक दाखवून खंडणीसाठी येळेगाव साखर कारखाना रोडवर कस्तुरकर यांना तब्बल पाच तास जबर मारहाण करण्यात आली. आरोपींनी गोळीबार देखील केल्याचा आरोप कस्तूरकर यांनी केला आहे. कस्तूरकर यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण देखील आहेत.

पोलिसांकडून केवळ मारहाणीचा गुन्हा

दरम्यान दहा लाख 40 हजार रुपयांची खंडणी दिल्यानंतर आरोपींनी त्यांना सोडून दिले. मात्र गंभीर गुन्हा असताना देखील अर्धापुर पोलिसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल न करता केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप नंदकिशोर कस्तूरकर यांनी केला आहे. पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी कस्तुरकर यांनी केली आहे.

मुंबईतील बिझनेसमनकडे अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या नावे खंडणी

दुसरीकडे, मुंबईतील घाटकोपर भागात राहणाऱ्या एका बड्या व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावाने धमक्या देण्यात आल्या आहेत. परदेशातून आलेल्या फोन कॉलद्वारे या गुंडाने 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर आता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावे मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे 50 लाखांची मागणी

(Nanded Bike Rider allegedly beaten up extortion after Kidnapping)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.