AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

64 दिवसांत फाशीची शिक्षा, नांदेडमधील बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात कोर्टाचा जलद निकाल

पोलिसांनी या प्रकरणात 19 दिवसात तातडीने तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. (Nanded Girls Sexual Assault )

64 दिवसांत फाशीची शिक्षा, नांदेडमधील बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात कोर्टाचा जलद निकाल
अत्याचार आणि हत्या प्रकरणात अवघ्या 64 दिवसांत शिक्षा
| Updated on: Mar 23, 2021 | 4:10 PM
Share

नांदेड : नांदेडमधील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात अवघ्या न्यायालयाने 64 दिवसांत शिक्षा सुनावली आहे. अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेला पळवून नेऊन अत्याचार करत खून केल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. (Nanded man sentence to death for Girls Sexual Assault and murder by court in 64 days)

सालगड्याकडून शेतमालकांच्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

पोलिसांनी या प्रकरणात 19 दिवसात तातडीने तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. 20 जानेवारी 2021 रोजी नांदेड जिल्ह्यातील दिवशी इथे अत्याचार आणि हत्येची घटना घडली होती. सालगड्याने आपल्याच शेतमालकांच्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली होती.

आरोपी बाबूराव सांगेराव हा घटनास्थळी दडून बसला होता. गायब झालेल्या मुलीचा शोध घेत असताना आरोपी गावकऱ्यांना सापडला. त्याचवेळी पोलीस तिथे आल्याने जमावाच्या तावडीतून आरोपी बचावला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास पूर्ण केला. या प्रकरणी पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने तत्पर सुनावणी पूर्ण केली.

चाळीसाव्या दिवशी फाशीची शिक्षा

भोकर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हा खटला चालवण्यात आला होता. सबळ पुराव्यांवरुन आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख यांनी नराधम आरोपीला चाळीसाव्या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली.

प्रति जलदगती न्यायालयाप्रमाणे या गंभीर गुन्ह्याचा निकाल अवघ्या 64 दिवसात दिल्याने मयत पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त होत आहे. एखाद्या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास पूर्ण करत न्यायालयाने देखील तितक्याच गतीने निवाडा दिल्याने या प्रकरणाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (Nanded man sentence to death for Girls Sexual Assault and murder by court in 64 days)

यवतमाळमध्ये बलात्कारी आजोबाला जन्मठेप

बालवयातच आई-वडीलांच छत्र हरविलेल्या 11 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने दोषी आजोबाला जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आल्याची घटना नुकतीच यवतमाळमध्ये उघडकीस आली होती. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोईद्दुीन एम.ए. यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा निकाल दिला होता.

संबंधित बातम्या :

नातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेपेची शिक्षा

NGO च्या नावाखाली फोनवर संपर्क, वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक

(Nanded man sentence to death for Girls Sexual Assault and murder by court in 64 days)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.