वर्दळीच्या ठिकाणी चाकूने भोसकून तरुणाची हत्या, आरोपी फरार; पोलिसांकडून तपास सुरु

नांदेड शहरातील मुरमुरा गल्ली हा परिसर वर्दळीचं ठिकाण आहे. या ठिकाणी दिवसाढवल्या 30 वर्षीय तरुणावर हल्लेखोराने चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर आरोपीने चाकू तिथेच टाकून घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, हा प्रकार घडत असताना कुणीही आरोपीला रोखण्यासाठी पुढे आलं नाही.

वर्दळीच्या ठिकाणी चाकूने भोसकून तरुणाची हत्या, आरोपी फरार; पोलिसांकडून तपास सुरु
नांदेडमध्ये तरुणाची हत्या
राजीव गिरी

| Edited By: सागर जोशी

Dec 21, 2021 | 4:25 PM

नांदेड : शहरात एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नांदेड (Nanded) शहरातील मुरमुरा गल्लीत एका तीन वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्या करुन आरोपी पसार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

नांदेड शहरातील मुरमुरा गल्ली हा परिसर वर्दळीचं ठिकाण आहे. या ठिकाणी दिवसाढवल्या 30 वर्षीय तरुणावर हल्लेखोराने चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर आरोपीने चाकू तिथेच टाकून घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, हा प्रकार घडत असताना कुणीही आरोपीला रोखण्यासाठी पुढे आलं नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या हत्येच्या या घटनेमुळे वजीराबाद पोलीस ठाणे परिसर हादरुन गेलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

तोतया डॉक्टरकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी अजून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका तोतया डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय पीडितेचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकीही तो तिला देत होता.

काय आहे प्रकरण?

तोतया डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. त्याने तरुणीचे अश्लील फोटो देखील काढून ठेवले होते. माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन, अशी धमकी हा डॉक्टर सातत्याने तरुणीला देत होता.

तोतया बंगाली डॉक्टरचा पोबारा

या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र तोतया बंगाली डॉक्टरला गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच त्याने पोबारा केला.

इतर बातम्या :

TET scam 2018 | टीईटी परीक्षा  घोटाळा; पुणे पोलिसांनी अटक केले सुखदेव डेरे कोण?

अपघाताचा बनाव करुन मुंबईत 35 लाखांची लूट, 25 ठिकाणांचे CCTV फुटेज तपासून आरोपीला अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें