Arrested : नवापूर काॅलेज रोडवर गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक, एलसीबी विभागाची कारवाई!

नवापूर शहराच्या प्रवेशद्वारा जवळच शहरातील सर्वात मोठ्या महाविद्यालयाच्या गेटवरच चक्क गांजा विक्री होत असल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपीकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या गेटवरच या व्यक्तीला पकडण्यात आल्यामुळे पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे.

Arrested : नवापूर काॅलेज रोडवर गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक, एलसीबी विभागाची कारवाई!
Image Credit source: tv9
जितेंद्र बैसाणे

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 02, 2022 | 11:41 AM

नंदुरबार : नवापूर (Navapur) शहरातील काॅलेज रोडवर एक व्यक्ती सुका गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून शोध घेत कारवाई करण्यात आली. सुका गांजा एका प्लास्टिक पिशवीत विक्री करत असलेला व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे असलेला साडेआठ हजार रूपये किंमतीचा एक किलो सुका गांजा जप्त करण्यात आला. नवापूर शहरातील काॅलेज रोडवर कायमच नागरिकांची वर्दळ असते आणि अशाठिकाणी गांजा विक्री (Cannabis sales) होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी लगेच दाखल झाले आणि ही कारवाई केली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थाची विक्री

जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या विक्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे. गांजा तस्करी करणारा नवापूर शहरातील इस्लामपुरा भागात राहणारा 62 वर्षी शेख गब्बान शेख अरमान याला ताब्यात घेतले असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील चाैकशी करण्यास सुरूवात केलीयं. या व्यक्तीकडे गांजा नेमका कुठून आला याचा तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

महाविद्यालयाच्या गेटवरच चक्क गांजा विक्री सुरू

नवापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळच शहरातील सर्वात मोठ्या महाविद्यालयाच्या गेटवरच चक्क गांजा विक्री होत असल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपीकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या गेटवरच या व्यक्तीला पकडण्यात आल्यामुळे पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. हा व्यक्ती नेमका कोणाला गांजा विक्री करत होता, याबाबत देखील पोलिस शोध घेत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें