AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीच्या घरी प्रियकराची आत्महत्या; बसमध्ये ओळख, पण शेवट नाशिकमधल्या रस्त्यावर बेवारस

त्याने तिच्यावर जीवापाड प्रेम (Love) केले. तिच्यासाठी घर-दार सारे सोडले. मात्र, प्रेयसीने लग्नाचा कारण करत त्याचा छळ मांडला. या छळाने इतके टोक गाठले की, त्याने शेवटी तिच्याच घरात गळफास घेत आपला शेवट केला. मात्र, तिथेही त्याची परवड थांबली नाही.

प्रेयसीच्या घरी प्रियकराची आत्महत्या; बसमध्ये ओळख, पण शेवट नाशिकमधल्या रस्त्यावर बेवारस
Privet lender Image Credit source: TV9
| Updated on: Mar 01, 2022 | 12:03 PM
Share

नाशिकः त्याने तिच्यावर जीवापाड प्रेम (Love) केले. तिच्यासाठी घर-दार सारे सोडले. मात्र, प्रेयसीने लग्नाचा कारण करत त्याचा छळ मांडला. या छळाने इतके टोक गाठले की, त्याने शेवटी तिच्याच घरात गळफास घेत आपला शेवट केला. मात्र, तिथेही त्याची परवड थांबली नाही. प्रेयसीने आत्महत्या (Suicide) केलेल्या आपल्या प्रियकराचा मृतदेह नाशिकमध्ये (Nashik) चक्क रस्त्यावर फेकून दिला. त्याची अपघातात मृत्यू अशी नोंद व्हावी, आपण त्यातून सहिसलामत सुटावे. यासाठी तिने नाना प्रयत्न केले. मात्र, पोलिसांचे हात तिच्यापर्यंत पोहचलेच. अन् या मृत्युप्रकरणाचे गूढ अखेर उकलले. तेव्हा तपास करणारे पोलिसही या प्रकाराने हादरून गेले. प्रेम-प्रेम ते असे असते का, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय.

नेमके प्रकरण काय?

रमेश रवींद्र मोरे (वय 25, रा. भुसावळ) असे त्याचे नाव. रमेशची एका बस प्रवासात एका महिलेशी ओळख झाली. तिचे वय 45 वर्षे. त्यांनी एकमेकांना आपले मोबाइल क्रमांक यावेळी शेअर केले. पुढे बोलणे वाढले. भेटी-गाठी होत गेल्या. रमेश नकळतपणे या महिलेत गुंतत गेला. तिच्यासाठी तिने आपले घरीही सोडले. तो तिच्याच घरात जाऊन राहू लागला. प्रेयसीने रमेशच्या मागे लग्नाचा तगादा लावला. त्याने गावाकडे जाऊन लग्न करू नये, आपल्यासोबत रहावे, अशी तिची इच्छा होती. शिवाय तिने त्यासाठी त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हे प्रकरण इतके टोकाला गेले की, शेवटी रमेशने प्रेयसीच्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली.

प्रेयसीने रस्त्यावर फेकले

रमेशने आत्महत्या करताच प्रेयसी हादरली. हे प्रकरण अंगावर शेकू शकते, असा अंदाज तिला आला. त्यामुळे तिने आपला वीस वर्षांचा मुलगा आणि एका मित्राची मदत घेतली. रमेशचा मृतदेह दुचाकीवर बसवून महामार्गावर आणला. रात्रीच्या वेळी त्याला रस्त्यावर फेकून दिले. आडगाव परिसरातील एच. पी. पेट्रोल पंपाजवळ हा मृतदेह बेवारस पडून होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. शेवटी ओझर परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरी धडकले आणि साऱ्या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणी मृताचे काका राजू मोरे (रा. जळगाव) यांनी पोलिसात तक्रार दिलीय.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.