बिल्डरला 20 लाखांचा गंडा, नाशिकमधील प्रकार; महिला कर्मचाऱ्याने केली फसवणूक

नाशिक (Nashik) येथील एका बिल्डरला (Builder cheated) महिला कर्मचाऱ्याने तब्बल 20 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिव्यानी जैन या महिलेस बेड्या ठोकल्या आहेत.

बिल्डरला 20 लाखांचा गंडा, नाशिकमधील प्रकार; महिला कर्मचाऱ्याने केली फसवणूक
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः नाशिक (Nashik) येथील एका बिल्डरला (Builder cheated) महिला कर्मचाऱ्याने तब्बल 20 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिव्यानी जैन या महिलेस बेड्या ठोकल्या आहेत. (Builder cheated of Rs 20 lakh in Nashik, female employee arrested)

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बिल्डर प्रसन्ना सायखेडकर (रा. त्र्यंबक रोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. सायखेडकर यांचे वडील सुभाष सायखेडकर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची विजय ललवाणी यांच्याशी भागिदारी आहे. त्यांनी मखमलाबाद येथील एका भूखंडावर जय एन्टरप्रायझेसच्या माध्यमातून प्रकल्प उभारला आहे. त्यातील 23 सदनिका आणि 2 व्यापारी गाळे सायखेडकर यांच्या मालकीचे आहेत. उर्वरित गाळे आणि सदनिका ललवाणी यांच्या आहेत. या सदनिकांची विक्री करण्यासाठी सायखेडकर यांनी पेठरोड येथील दिव्यानी मंगलचंद जैन (वय 28) या महिलेची नियुक्ती केली होती. या महिलेने 2020 ते 2021 या काळात बारा ग्राहकांना सदनिका विकल्या. त्याचे पैसे कंपनीच्या खात्यात न भरता रोख स्वीकारून लंपास केले. इतकेच नाही तर सदनिकांची कुलूप तोडून त्यांचा ग्राहकांना ताबा दिला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सायखेडकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी संशयित महिला दिव्यानी जैन हिला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. माळी हे करत आहेत. दरम्यान, गेल्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये खून, चोरी, लूटमार असे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्या वेळी एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नाही, पोलीस हेल्मेट सक्तीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे.

अडीच लाख लुटले

शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपये असलेली बॅग लुटली. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम नेवदराम दियालानी (रा. टागोनगर) यांनी दुपारी आपली कार (एम. एच.15 ईआर 3133) शालिमार भागातील सांगली बँक सिग्नल परिसरातील जगन्नाथ रेस्टॉरंटसमोर उभी केली होती. तेव्हा चोरट्याने या कारची काच फोडली. चालकाच्या सीटवर असलेली बॅग लंपास केली. या बॅगेमध्ये अडीच लाखांची रक्कम आणि महत्त्वाची कागपदत्रे होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Builder cheated of Rs 20 lakh in Nashik, female employee arrested)

इतर बातम्याः

भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना

नाशिककरांना मिळणार नवी घरे; जुन्या इमारतींचा होणार पुनर्विकास, नगरविकास खाते राजी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI