निवडणूक निकालाधीच काळाचा घाला; उमेदवाराचा अपघातात मृत्यू

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणामधील ही घटना आहे. पंकज पवार असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

निवडणूक निकालाधीच काळाचा घाला; उमेदवाराचा अपघातात मृत्यू
पंकज पवार
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 5:56 PM

नाशिक : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नगरपंचायत निवडणुकीचा (Nagar Panchayat Election) निकाल लागण्याआधीच उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. नाशिक ( nashik ) जिल्ह्यातील सुरगाणामधील (surgana) ही घटना आहे. पंकज पवार असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. पंकजसह आणखी एकाचा अपघाती मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव दुचाकी झाडाला आदळून हा अपघात झाला. या अपघातामध्ये पंकज पवार यांच्यासह एक जणाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळतचा स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमीवर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पंकज याने सुरगाणा नगरपंचायतची निवडणूक लढवली होती. मात्र निकाल येण्याआधीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.

दोघांचा मृत्यू एक जखमी

घटनेबाबत अधिक माहिती अशी की सुरगाना नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवार पंकज पवार  हे अन्य दोघांसोबत दुचाकीवरून चालले होते. मात्र दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव दुचाकी झाडाला धडकली. या घटनेत पंकज यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. पंकज यांच्यासोबत अन्य एका व्यक्तीचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

निवडणूक निकाला आधीच मृत्यू

पंकज  पवार यांनी सुरगाणा नगरपंचायतीच्या प्रभाग 12 मधून निवडणूक लढवली होती. 19 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र निकाल लागण्यापूर्वीच पंकज पवार यांच्यावर काळाने घाला घातला. दुचाकी अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पवार यांच्या मृत्यूमुळे शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Yavatmal murder | डॉ. हनुमंत धर्मकारे खून प्रकरणाचा उलगडा, तीन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; गोळीबार करण्यामागचा उद्देश काय?

Wardha : वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती, काळवीटाचे कातडे जप्त

Dapoli Crime: चोरीच्या उद्देशानेच दापोलीतील तिहेरी हत्याकांड, दीड लाखांचे दागिने लंपास

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.