VIDEO : नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, महिला पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई

राज्यातील विविध भागांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई करण्यात आली आहे.

VIDEO : नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, महिला पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई
VIDEO : नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, महिला पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई


नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई करण्यात आली आहे. मुंबईतील अमानवीय बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी आता राज्यभरात अशी कारवाई सुरु केली आहे. पोलिसांकडून दुकानांच्या बाहेर मद्यपान करणाऱ्यांनासुद्धा चोप दिला जातोय.

शहरातील टवाळखोरांचे धाबे दणाणले

विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून टवाळखोरांची धुलाई केली जात आहे. महिला पोलिसांकडून नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील उद्याने, खाद्य पदार्थ, दुकानाच्या बाहेर बसून मद्यपान करणाऱ्यांना चोप दिला जातोय. त्यामुळे शहरातील टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

महाराष्ट्रात वारंवार बलात्काराच्या घटना

महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत. पुणे, अमरावती, उल्हासनगर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटना तसेच मुंबईतील निर्भया हत्याकांडासारखी भयानक घटना ताजी असताना जालना जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात अवघ्या 12 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बदनापूर तालुक्यातील एका गावात मंगळवारी (14 सप्टेंबर) दुपारी पीडित मुलगी घरासमोर एकटी कोंबड्यांना दाणे टाकत होती. यावेळी तिच्या घरात इतर सदस्य नव्हते. याच गोष्टीची संधी साधून बाजूच्या शेतात राहणाऱ्या आरोपी अनवर खान याने मुलीला जबरदस्ती आपल्या घरात नेलं. तिथे तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. पीडित मुलीने शेतात काम करणाऱ्या आपल्या आईला ही हकीकत सांगितल्याने मुलीच्या आईने बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दरम्यान, अमरावतीत जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडित तरुणी 17 वर्षाची आहे. यातून ती 7 महिन्याची गर्भवती राहिली. मात्र बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतः ला गळफास लावून संपवलं. सध्या येवदा पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल केला आहे. यासंदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत.

पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार

दुसरीकडे, पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. संबंधित शिक्षिकेला पैशाची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्थी यांच्याकडे पैशाची मागणी केली. आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेकवर ,कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्ट ड्रिंक देऊन दुष्कृत्य केले. तसेच पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून, ते सर्वांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

पुणे शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

पुण्यात आठ दिवसांपूर्वी एका 13 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे. विशेष म्हणजे या घटनेतही अत्याचार करणारा हा एक रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडितेला फुटपाथवरुन उचलून नेत अपहरण

पीडित सहा वर्षीय चिमुकली ही रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपली होती. आरोपीने तिला फुटपाथवरुन उचलून नेत तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. या संतापजनक प्रकाराची माहिती पीडितेच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच पीडितेला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा :

‘तुला भांडणंच लागतात’, पतीचे बोल जिव्हारी, महिलेने रागात स्वत:ची जीभ कापली

नोकरीच्या शोधात त्याच्या जीवनाचा अंत, डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर रक्तबंबाळ अवस्थेत तरुण, उपचारादरम्यान मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI