नोकरीच्या शोधात त्याच्या जीवनाचा अंत, डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर रक्तबंबाळ अवस्थेत तरुण, उपचारादरम्यान मृत्यू

डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नोकरीच्या शोधात त्याच्या जीवनाचा अंत, डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर रक्तबंबाळ अवस्थेत तरुण, उपचारादरम्यान मृत्यू
नोकरीच्या शोधात त्याच्या जीवनाचा अंत, डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर रक्तबंबाळ अवस्थेत तरुण, उपचारादरम्यान मृत्यू

कल्याण (ठाणे) : डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी नोकरीचं आमिष देवून मृतकाची फसवणूक केली. विशेष म्हणजे आरोपी बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून लुबाडायचे, अशी माहिती आता पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. आरोपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना बोलावून घ्यायचे. त्यांच्याकडील वस्तू लुटून पळ काढायचे. त्यांनी अशाच एका निष्पाप व्यक्तीला नोकरीचे आमिष दाखवून बोलावून घेतले. त्याच्याकडील वस्तू लूटण्याच्या प्रयत्नात त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पीडित व्यक्तीला डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर फेकून दिलं.

मृतक व्यक्तीचं कृष्णमोहन तिवारी असं नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारावर चार आरोपींचे बिंग फोडले. धक्कादायक म्हणजे मुख्य आरोपी हा 15 सीमकार्ड आणि 4 मोबाईलचा वापर करत होता. पोलिसांनी चौघांना अटक करुन त्यांनी आतापर्यंत किती लोकांना लूटले आहे? याचा तपास सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

11 सप्टेंबरच्या सकाळी 11 वाजताच्या सुमारास खंबालपाडा रोडवर एक तरुण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. काही ट्रॅफिक वार्डनने हे पाहिले. त्याची माहिती मानपाडा पोलिसांना देण्यात आली. जखमी व्यक्ती बेशूद्ध असल्याने त्याच्याकडून काही माहिती मिळाली नाही. त्याच्या खिशात त्याचे आधारकार्ड सापडले. त्यातून त्याची ओळख पटली. त्याचे नाव कृष्णमोहन तिवारी असे होते. पोलिसांनी तपास सुरु केला. पण दुर्देवाने या व्यक्तीचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी तपास कसा केला?

पोलिसांनी मृतक कृष्णमोहनतिवारी यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. यावेळी पप्पा ठाकुर्लीला एक काम आहे, असं सांगून घराबाहेर पडले होते, अशी माहिती त्याच्या मुलीने पोलिसांना दिली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी डीसीपी विवेक पानसरे, एसीपी जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, मानपाडा पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांनी तपास सुरु केला. कृष्णमोहन तिवारी यांचा वडिलांची काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये संपत्तीच्या वादातून हत्या झाली होती. पोलिसांसमोर हा पण एक अँगल होता.

आरोपींनी वापरलेले सीमकार्ड हे दुसऱ्याचे

मानपाडा पोलिसांनी सीडीआर काढला. ज्या व्यक्तीने फोन केला होता त्याचा मोबाईल स्वीच ऑफ होता. सीमकार्डच्या आधारे सीमकार्ड ज्या व्यक्तीचे होते त्याला पोलिसांनी शोधून काढले. ज्या व्यक्तीच्या नावे सीमकार्ड घेतले होते त्या व्यक्तीला काही माहिती नव्हती. त्याच्या कागदपत्रांचा वापर सीमकार्ड खरेदी करण्यासाठी करण्यात आला होता. दोन दिवसांसाठी हे सीमकार्ड घेतले होते.

अखेर एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

तांत्रिक माहितीच्या आधारे अखेर पोलीस रेहान शेख या तरुणापर्यंत पोहचली. याच तरुणाने कृष्णमोहनला फोन केला होता. रेहान बेराजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी एका प्लेसमेंटमध्ये काम करीत होता. त्याच्याकडे बेरोजगार तरुण ज्यांना नोकरी पाहिजे त्यांचा संपूर्ण डेटा उपलब्ध होता. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली रेहान आणि त्याचे साथीदार लोकांना बोलावून घ्यायचे आणि लुटत असत.

चौघांना बेड्या

कल्याणचे डीसीपी पानसरे यांनी माहिती दिली की, कृष्णमोहन तिवारीला बोलावून घेत रेहान आणि त्याच्या साथीदारांनी एमआयडीसीतील निजर्नस्थळी नेले. त्याला मारहाण केली. त्याच्याकडील वस्तू लूटून त्याला जखमी करुन खंबाळपाडा रस्त्यावर फेकून दिले. या प्रकरणी रेहान शेख त्याचे साथीदार सागर कोनाला, सुमित सोनावणे आणि एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

मृतक कृष्णमोहनला परदेशातील कंपनीत काम करण्याचा अनुभव, पण…

धक्कादायक म्हणजे फक्त या कामासाठी रेहान 15 सिम कार्ड 4 मोबाईल वापरत होता. मृतक कृष्णमोहन तिवारी हा मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो कतार येथे काम करुन मायदेशी परतला होता. लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली होती. सध्या तो नोकरीच्या शोधात होता. पण नोकरीचा शोध हा त्यांच्या जीवनाचा अंत ठरला.

हेही वाचा :

पैशांसाठी नाही, ‘या’ कारणासाठी पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण, अटकेतील संशयितांचा खळबळजनक खुलासा

65 वर्षीय नराधमाकडून अवघ्या 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, जालना हादरलं, महाराष्ट्रात बलात्काराचे सत्र अजूनही सुरुच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI