AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC आंदोलनाला राज ठाकरेंचा सशर्त पाठिंबा? विद्यार्थ्यांच्या रागाशी सहमत, पण आंदोलनाच्या मुद्द्यांवर वेगळी भूमिका

MPSC Students Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी अध्यक्षांना हटवणं राज्याच्या हातात नाही, असं वक्तव्य केले आहे.

MPSC आंदोलनाला राज ठाकरेंचा सशर्त पाठिंबा? विद्यार्थ्यांच्या रागाशी सहमत, पण आंदोलनाच्या मुद्द्यांवर वेगळी भूमिका
| Updated on: Oct 05, 2026 | 9:16 PM
Share

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि भरतीबाबतच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या पाचव्या दिवसापर्यंतही विद्यार्थ्यांचा आक्रोश कायम असल्याचे वृत्त आहे. मात्र यावळी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे विद्यार्थी संभ्रमात असल्याचे दिसून आले आहे. तसेच राज ठाकरेंची एपीएमसी आंदोलकांशी भेट, पण भूमिकेवर समेट नाही, असं दिसून आले.

राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या प्रश्नांबाबत सहवेदना व्यक्त केली. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे आंदोलनाला पाठिंबा नेमका कोणत्या मुद्द्यांवर आहे, याबाबत काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा होत आहे. राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील संतापाशी आपण सहमत असल्याचे सांगितले. मात्र आंदोलनातील प्रत्येक मागणी किंवा भूमिकेला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी व्यापक व्यवस्थेवर भाष्य केले.

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांना हटवण्याच्या मागणीबाबतही राज ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. अध्यक्ष हे घटनात्मक पदावर असल्याने त्यांना थेट राज्य सरकार किंवा राज्यपाल हटवू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षांच्या नियुक्ती आणि पदावरून हटवण्याची प्रक्रिया संविधानाच्या कलम 317 अंतर्गत वेगळी असल्याचे सरकारकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे गेल्या काही दिवसांपासून ज्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत, त्यावर राज ठाकरेंची भूमिका आंदोलकांसाठी महत्त्वाची ठरली आहे. विद्यार्थ्यांचा संताप रास्त असला, तरी पुढील दिशा ठरवण्यापूर्वी नेमकी घटनात्मक प्रक्रिया समजून घेण्याची गरज असल्याचा संदेश त्यांच्या भूमिकेतून दिसून आला. राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सरकारवर दबाव वाढवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा परिणाम भविष्यातील पिढीवर होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणे हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे राज ठाकरेंची आंदोलनस्थळी झालेली भेट ही विद्यार्थ्यांच्या संतापाला पाठिंबा देणारी असली तरी MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसह प्रत्येक मागणीबाबत त्यांची भूमिका स्वतंत्रपणे पाहावी लागणार आहे. परिणामी आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आणि राज ठाकरेंच्या भूमिकेचा त्यावर किती परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?