Navi Mumbai Crime : टास्क पूर्ण करून कमिशनचे आमिष दाखवून फसवणाऱ्याला अटक, नवी मुंबई पोलिसांची कारवाई

ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे सध्या बरेच वाढले आहेत. अशाच एका प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक केली.

Navi Mumbai Crime : टास्क पूर्ण करून कमिशनचे आमिष दाखवून फसवणाऱ्याला अटक,  नवी मुंबई पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 12:14 PM

रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : साध्या-भोळ्या लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि सोप्या मार्गाने, झटपट पैसे मिळवण्यासाठी अनेक गुन्हेगार कार्यरत आहेत. त्यासाठी आजकाल मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या किंवा सायबर क्राईमच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशीच एक घटना नवी मुंबईत उघडकीस आली असून नवी मुंबई पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत फसवणूक करणाऱ्या त्या भामट्याला बेड्या ठोकून अटक केली.

आकाश उमेश पांडे (वय 35) असे आरोपीचे नाव असून सायबर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी आकाश हा काही लोकांशी टेलीग्रामद्वारे संपर्क साधून त्यांना विविध वेबसाईट वरील टास्क पूर्ण केल्यास जास्तीचे कमिशन देण्याचे आमिष दाखवायचा. आणि नंतर त्यांची फसवणूक करून पैसे लुबाडायचा असे समोर आले आहे. याप्रकरणी नवी मुंबई येथे एका इसमाने तक्रार नोंदवली होती. त्यानंतर अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी कसून शोध घेत आरोपी आकाशला अटक केली. मूळचा पश्चिम बंगाल येथे असलेल्या आरोपी आकाशविरोधात महाराष्ट्रात ४ तर देशातील इतर राज्यांमध्ये २१ सायबर तक्रारी दाखल असल्याचेही समोर आले आहे.

अशी केली फसवणूक

वर नमूद केल्याप्रमाणे आरोपी आकाश पांडे हा मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून तो उच्चशिक्षीत आहे. सध्या तो पुण्यातील लोहगाव येथील एका नामांकित कंपनीमध्य अकाऊंटंट म्हणून कामही करत होता. टेलीग्राम या ॲपद्वारे तो विविध लोकांशी संपर्क साधायचा. आणि काही ठराविक टास्क्स ( ऑनलाइन) पूर्ण केल्यास त्याचे कमिशन मिळेल अशी लालूच त्यांना दाखवायाचा. हळूहळू त्यांचा विश्वास संपदान करून तो त्यांची फसवणूक करायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पांडे या फसवणुकीची रक्कम क्रिप्टोकरंसी USDT मध्ये स्विकारत होता. तसेच या गुन्ह्यात तो एकटाच सहभागी नव्हता तर त्याचे इतरही साथीदार होते. त्यांच्याशी तो सतत संपर्कात असायचा नवी मुंबईतील एका इसमाने त्याची फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे साबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. या गुन्हयात वापरलेले बँक खाते व मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी संशयित आरोपीची(आकाशची) माहिती काढली. तो लोहगाव येथील रहिवासी असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन तपास केला.

त्यानंतर संशयित आरोपी पांडे याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने व त्यानेही गुन्ह्याची कबूली दिल्याने सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीचा महाराष्ट्र राज्यामधील ०४ तसेच इतर राज्यातील २१ सायबर तकारी मध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तसेच फिर्यादींनी आकाश याला दिलेली रक्कम ज्या बँकेत होती तेथील सर्व बँक खाती गोठवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पत्रव्यवहार केला. आणि त्या बँक खात्यांमधून एकूण 5 लाख 90 हजार 590 रुपये, इतकी रोख रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश मिळाले.

Non Stop LIVE Update
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.