AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील 42 कोटींच्या सोनेतस्करीचे सांगली कनेक्शन? NIA च्या एन्ट्रीने खळबळ

दिल्लीतील आंतरराष्ट्रीय सोने तस्करी प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेची टीम सांगली जिल्ह्यात पोहोचली आहे. (NIA Sangli gold smuggling)

दिल्लीतील 42 कोटींच्या सोनेतस्करीचे सांगली कनेक्शन? NIA च्या एन्ट्रीने खळबळ
| Updated on: Dec 23, 2020 | 4:42 PM
Share

सांगली : दिल्लीतील आंतरराष्ट्रीय सोने तस्करी प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेची टीम सांगली जिल्ह्यात पोहोचली आहे. ही टीम जिल्ह्यातील विटा येथे दाखल झाली असून अत्यंत गुप्त पद्धतीने ते तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने वीटा, खानापूर येथील काही सराफा व्यापाऱ्यांना समन्स बजावले आहे. एनआयएकूडन त्यांची चौकशी केला जाणार आहे. समन्स जारी केलेल्या सराफांना 26 डिसेंबरपर्यंत विटा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. (NIA tram in Sangli for inquiry of Delhi gold smuggling worth of 42 crore)

नेमके प्रकरण काय ?

चार महिन्यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी दिल्ली रेल्वे स्थानकावर तब्बल 83 किलो सोने जप्त करण्यात आले होते. हे सोने आठ तस्करांनी गुवाहाटीहून दिल्लीला आणले होते. त्यासाठी त्यांनी रेल्वेद्वारे प्रवास केला होता. दरम्यान, दिल्ली रेल्वे स्थानकावर या तस्करांना पकडण्यात आले होते. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालणालय (DRI) विभागाने केली होती. त्यावेळी पकडण्यात आलेल्या सोन्याची किंमत बाजारमूल्यानुसार 42 कोटी रुपये होती.

सोने तस्करीसाठी बनावट आधारकार्ड

सोन्याच्या हाय प्रोफाईल तस्करीसाठी आठही आरोपींनी स्व:तचे बनावट आधार कार्ड बनवले होते. शिवाय त्यांनी आतापर्यंत म्यानमार देशातून भारतामधील मनिपूरच्या सीमेवरही सोन्याची तस्करी केल्याचे समोर आलेले आहे.

याच प्रकाराची चौकशी करण्यासाठी आता राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक थेट सांगलीत दाखल झाले आहे. या आंतरराष्ट्रीय सोने तस्करीची साखळी सांगलीपर्यंत पसरल्याचे बोलले जात असल्याने सांगली जिल्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून विटा आणि खानापूरच्या काही सराफा व्यापाऱ्यांना समन्स जारी करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या चौकशीतून काय समोर येईल, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

‘मटका क्वीन’ जया भगतच्या हत्येचा कट उघड, दिरानेच दिली सुपारी; पाचजण जेरबंद

औषध लावण्याच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग, मुंबईत वॉर्डबॉयला बेड्या

Suresh Raina arrested : क्रिकेटपटू सुरेश रैना आणि सुझान खान यांची अटकेनंतर सुटका

(NIA tram in Sangli for inquiry of Delhi gold smuggling worth of 42 crore)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.