औषध लावण्याच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग, मुंबईत वॉर्डबॉयला बेड्या

औषध लावण्याच्या बहाण्याने आरोपी वॉर्डबॉयने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

औषध लावण्याच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग, मुंबईत वॉर्डबॉयला बेड्या

मुंबई : औषध लावण्याच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला होता. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या. (Ward boy arrested for allegedly molesting woman in a Mumbai hospital)

तक्रारदार महिला रुग्णावर मालाडमधील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर औषध लावण्याच्या बहाण्याने आरोपी वॉर्डबॉयने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. गेल्या मंगळवारी रुग्णालयातच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे.

पीडित महिलेच्या कुटुंबियानी गोरेगावमधील दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी वॉर्ड बॉयला पोलिसांनी शनिवारी अटक केली. या प्रकरणी एफआयआर दाखल करुन दिंडोशी पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यातही महिलेचा विनयभंग

पुण्यात वॉर्डबॉयने महिला रुग्णाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधील खासगी रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात उघडकीस आला होता. रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयने विनयभंग केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

संबंधित बातम्या :

पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक

(Ward boy arrested for allegedly molesting woman in a Mumbai hospital)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI