पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक

पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील वॉर्डबॉयने विनयभंग केला (Molestation of Corona positive Women in Pune).

पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक
Follow us
| Updated on: Aug 02, 2020 | 11:41 AM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकिकडे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्ग झालेल्या रुग्णांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे काही अपप्रवृत्तीही समोर येत आहेत. हडपसरमधील खासगी रुग्णालयात असाच एक धक्कादायक प्रकार घडला. या रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील वॉर्डबॉयने विनयभंग केला (Molestation of Corona positive Women in Pune). या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर हडपसर पोलिसांनी या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तसेच विनयभंगप्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला अटक केली. आरोपीचं नाव अशोक नामदेव गवळी (वय 40, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) असं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंनी शनिवारी 2 हजारांचा आकडा ओलांडला. शनिवारी (1 ऑगस्ट) दिवसभरात 5 मृत्यू झाले. जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या 2 हजार 35 वर पोहचली आहे. काल दिवसभरात 2 हजार 709 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली.

पुणे महापालिकेच्या 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

पुणे महापालिकेच्या 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये 298 जण कायमस्वरुपी तर 76 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी विमा कंपन्यांकडून चालढकल होत असल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि पालिकेत नोकरीचं आश्वासन पाळलं जाईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कामात हलगर्जीपण करणाऱ्या 11 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीस विभाग देखील सातत्याने कार्यरत आहे. मात्र, विभागातील काही पोलीस कर्मचारी हलगर्जीपणा करत असल्याचंही निदर्शनास आलं. यानंतर पोलीस आयुक्तांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पुणे पोलीस दलातील 11 जणांवर कारवाई केली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते कॉन्स्टेबल अशा 11 जणांचा समावेश आहे.

या सर्वांवर वेतनवाढ रोखण्यापासून निलंबनापर्यंतची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणे, अनावश्यक गुन्हे दाखल करणे असे आरोप होते. यात ते दोषी आढळल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा :

Pune Corona : पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्यांची माहिती

Pune | “मलाही अनेक आजार, पण मागे हटलो नाही”, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर निवृत्त

FYJC Admission | विद्यार्थ्यांना हमीपत्रावर अकरावीत प्रवेश, कागदपत्रांसाठी तीन महिन्यांची मुदत

Molestation of Corona positive Women in Pune

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.