FYJC Admission | विद्यार्थ्यांना हमीपत्रावर अकरावीत प्रवेश, कागदपत्रांसाठी तीन महिन्यांची मुदत

विद्यार्थ्यांकडे आवश्यक प्रमाणपत्र किंवा कागदपत्र नसल्यास प्रवेशासाठी हमीपत्र द्यावे लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे

FYJC Admission | विद्यार्थ्यांना हमीपत्रावर अकरावीत प्रवेश, कागदपत्रांसाठी तीन महिन्यांची मुदत
Follow us
| Updated on: Jul 31, 2020 | 8:42 AM

पुणे : दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेण्याचे वेध लागले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हमीपत्रावर अकरावीत प्रवेश देण्यात येत असून कागदपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. (SSC Results FYJC Admission begins Students can submit affidavit for entrance)

ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दहावीची गुणपत्रिका अपलोड करणे बंधनकारक आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दहावीची गुणपत्रिका शाळांकडून मिळण्यासही उशीर होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांकडे आवश्यक प्रमाणपत्र किंवा कागदपत्र नसल्यास प्रवेशासाठी हमीपत्र द्यावे लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीद्वारे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

विद्यार्थ्यांना काय करावे लागेल?

  • विद्यार्थ्यांकडे आवश्यक प्रमाणपत्र किंवा कागदपत्र नसल्यास प्रवेशासाठी हमीपत्र द्यावे लागेल
  • आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी
  • ज्या विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला, डोमिसाईल जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल, त्यांनी प्रवेश अर्ज भरताना अपलोड करावे
  • संबंधित प्रमाणपत्र नसल्यास ते तात्काळ अपलोड करण्याचे बंधन नाही
  • अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाणार
  • प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार
  • विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आणि हमीपत्र यांच्या आधारे देण्यात येणार आहे
  • राखीव कोट्यातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रे अपलोड करावे, अन्यथा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत अपलोड करावी

दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेत राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

संबंधित बातम्या

एकाच शाळेत, एकाच वर्गात, दहावीत गुणही सेम टू सेम, कोल्हापूरच्या जुळ्या भावांची अनोखी यशोगाथा

नातींकडून प्रोत्साहन, इचलकरंजीचे आजोबा दहावी उत्तीर्ण, वयापेक्षा अधिक टक्के

टॅब न दिल्याने आत्महत्या केलेल्या शेतकरीपुत्राला दहावीत 81 टक्के, निकाल ऐकून माऊलीने हंबरडा फोडला

SSC Result 2020 | बीडच्या पठ्ठ्याची कमाल, दहावीत सर्वच्या सर्व विषयात 35 गुण!

(SSC Results FYJC Admission begins Students can submit affidavit for entrance)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.