Nikita Tomar Murder Case : फरीदाबाद फास्ट ट्रॅक कोर्टाचा निकाल, आरोपी तौसीफ, रेहान दोषी, एकाची सुटका

निकिता तोमर हत्याकांड प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने आज आपला निकाल दिला आहे. फरीदाबाद फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपी तौसीफ आणि त्याचा मित्र रेहानला दोषी ठरवलं आहे.

Nikita Tomar Murder Case : फरीदाबाद फास्ट ट्रॅक कोर्टाचा निकाल, आरोपी तौसीफ, रेहान दोषी, एकाची सुटका
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 7:25 PM

नवी दिल्ली : निकिता तोमर हत्याकांड प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने आज आपला निकाल दिला आहे. फरीदाबाद फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपी तौसीफ आणि त्याचा मित्र रेहानला दोषी ठरवलं आहे. तर तिसरा आरोपी अजरुद्दीन, ज्याच्यावर हत्यार मिळवून दिल्याचा आरोप होता, कोर्टाने त्याची सुटका केली आहे. 26 मार्च रोजी दोषींच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. न्यायाधीश सरजात बासवाना यांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने तौसीफ आणि रेहानला भारतीय दंड विधान कलम 302, 34, 120B, 366, 511 अंतर्गत दोषी ठरवलं आहे. (Faridabad fast track court verdict in Nikita Tomar murder case, Tauseef and Rihan convicted)

26 ऑक्टोबर 2020 मध्ये हरियाणाच्या वल्लभगड इथं निकिताची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. निकिता ही B.Comच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. आपल्या महाविद्यालयातून परीक्षा देऊन ती परतत असताना तिघांनी तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. निकिताने विरोध करताच गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. हत्येचा हा संपूर्ण प्रकार महाविद्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. फरीदापास पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तौसीफ, रिहान आणि अजरुद्दीनला अटक केली होती.

कोर्टात 55 जणांची साक्ष

फास्ट ट्रॅक कोर्टाने 1 ऑक्टोबर 2020 रोजी ट्रायल सुरु केली. या प्रकरणात एकूण 30 सुनावणीमध्ये ट्रायल पूर्ण झाली. त्यानंतर कोर्टाने 23 मार्च रोजी आपला निकाल सुरक्षित केला. ट्रायल दरम्यान वादींकडून 55 आणि प्रतिवादींकडून 2 साक्षिदार हजर करण्यात आले. दरम्यान, कोर्टाच्या निकालापूर्वी निकिताचे वडील मुलचंद यांनी कोर्टाकडून अपेक्षा व्यक्त केली आहे की, दोषींना फाशीची शिक्षा सुनावली जाईल. ज्या प्रकारे एका हिंदू मुलीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा लव्ह-जिहादचा प्रकार आहे. सरकारने निकिताचा योग्य सन्मान केला पाहिजे आणि अशा प्रकरणात विशेष कायदा बनवला पाहिजे. ज्या माध्यमातून अन्य मुलींचा जीव वाचवता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.

इतर बातम्या :

अंबरनाथ लोकलमध्ये धड नसलेलं शिर, लगेजच्या डब्यात रात्री एक वाजता घटना उघड

भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह फासावर लटकवला, बंगालमधील हिंसाचार शिगेला

Faridabad fast track court verdict in Nikita Tomar murder case, Tauseef and Rihan convicted

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.