Nikki Murder Case: केस ओठले, चपलेने मारले नंतर…; निक्कीच्या आईने सांगितले जावयाचे कांड, वाचून अंगावर काटाच येईल
Nikki Murder Case: निक्कीच्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. आता निक्कीच्या आईने गेल्या ९ वर्षात जावई विपिनने काय काय केले याचा खुलासा केला आहे. चला जाणून घेऊया नेमकं घडलं काय...

ग्रेटर नोएडामधील निक्की हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात तिच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या आईला कशा प्रकारे मारले गेले याचे वर्णन केले आहे. निक्कीच्या आईनेही आता नवे खुलासे केले आहेत. तिने लेकीच्या लग्नाच्या ९ वर्षांदरम्यान जावई विपिन भाटीने हुंड्यासाठी निक्कीला कशा प्रकारे छळले याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. चला जाणून घेऊया नेमकं
ग्रेटर नोएडा निक्की हत्याकांड: नवे खुलासे
कासना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निक्की हत्याकांडाबाबत एकामागून एक नवे खुलासे समोर येत आहेत. मृतकेच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या वडिलांच्या कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. मुलाने सांगितले, “पप्पांनी मम्मीवर आधी काहीतरी ओतले, मग मम्मीच्या कानाखाली मारली आणि लायटरने आग लावली.” याशिवाय, निक्कीच्या आईने जावई विपिनबद्दल जे काही सांगितले, ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
वाचा: तुझी बायको मला, माझी बायको तुला! छोट्या गावात घाणेरडा खेळ; वाईफ स्वॅपिंगची भानगड आहे तरी काय?
निक्कीच्या आईचे खुलासे: हुंड्याच्या मागण्या आणि छळ
निक्कीच्या आईने सांगितले की, लग्नात हुंडा म्हणून स्कॉर्पियो गाडी दिली होती. तरीही रोज नव्या मागण्या केल्या जात होत्या. ती म्हणाली, “आम्हाला फक्त रक्ताच्या बदल्यात रक्त हवे आहे. आधी स्विफ्ट डिझायर कार मागितली होती. मग स्कॉर्पियो मागितली. आम्ही स्कॉर्पियो दिली. तरीही जावई कधी एक लाख रुपये मागायचा, तर कधी दोन लाख रुपये मागायचा. त्याचे एकच काम होते – फिरणे आणि मुलींना फिरवणे. लग्नाला ९ वर्षे झाली आहेत.”
जावयाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या
आईने पुढे सांगितले, “आम्ही जावई विपिन भाटीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. त्याच्या सांगण्यावरून त्याला बुलेट बाइकही दिली, जेणेकरून तो आमच्या मुलीला त्रास देणार नाही. ती तिथे सुखाने राहावी. जेव्हा माझ्या मुलीला जिवंत जाळले गेले, तेव्हा फक्त पाच मिनिटांपूर्वी माझे निक्कीशी बोलणे झाले होते. ती म्हणत होती, ‘मम्मी, मी आजच घरी येऊ का? हे लोक मला मारतील.’ त्यांनी निक्कीला मारहाण केली. ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर केमिकल टाकून आग लावली आणि माझ्या मुलीला मारले.”
सासूनेही केला छळ
निक्कीच्या आईने सांगितले, “आमच्या दुसऱ्या मुलीचेही त्याच घरात लग्न झाले आहे. विपिन निक्कीला शिवीगाळ करायचा. फक्त तिलाच नाही, तर आम्हालाही शिव्या द्यायचा. सासूही निक्कीचे केस धरुन ओढायची. चपलेने आणि काठीने मारायची. त्याचा व्हिडीओही आमच्याकडे आहे. माझ्या दुसऱ्या मुलीने एकदा त्या मारहाणीचा व्हिडीओ बनवला होता, जेणेकरून तो पुरावा म्हणून दाखवता येईल. पण या क्रूर लोकांनी तिला खरोखरच मारून टाकले. आम्हाला फक्त एवढेच हवे की जावई, सासू आणि सासऱ्याला फाशी द्यावी. आम्हाला रक्ताच्या बदल्यात फक्त रक्त हवे आहे.”
विपिनला कोणताही पश्चाताप नाही
दरम्यान, विपिनला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. ताब्यात असताना तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा कासना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याच्या पायात गोळी मारली. यामुळे तो जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा त्याला विचारले गेले की, त्याला आपल्या पत्नीला मारल्याचा आणि ही घटना घडवल्याचा पश्चाताप आहे का, तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. तो म्हणाला, “मला कोणताही पश्चाताप नाही. मी तिला मारले नाही. ती स्वतः मेली. पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होतात, ही अगदी सामान्य गोष्ट आहे.”
