ना CCTV फुटेज, ना साक्षीदार, बकरी आणि 2 कुत्र्यांनी सोडवली मर्डर मिस्ट्री,पोलिसही हैराण
ही कोणतीही फिल्मी कहानी नाही, तर प्रत्यक्षात असे घडले आहे. एका खुनाचा गुंता सोडवण्यासाठी माणूस फेल झाला ती मर्डर मिस्ट्री पाळीव प्राण्यांनी सोडविली आहे.

बेळगावात एका खुनाचा गुंता सोडवण्यात पाळीव प्राण्यांनी मदत केल्याचे अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे. येथे एका मेंढपाळाचा निर्घृण खून करण्यात आला होता. परंतू कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, ना मोबाईल लोकेशन, ना सीसीटीव्हीकडून मदत झाली. पोलिसांसमोर एक अधुरी रहस्यमय कहानी होती. परंतू जे कोणी करु शकला नाही ते काम बकरी आणि दोन इमानदार कुत्र्यांनी केले.
एक सायंकाळ, मर्डर आणि बकऱ्यांचं विचित्र वागणं
8 मेच्या सायंकाळी बेळगावातील हत्तियालूर गावाजवळ राहणाऱ्या 28 वर्षांचा रायप्पा कामाटी यांचा मृतदेह सापडला. तो नेहमीप्रमाण त्याच्या 60 बकऱ्यांना चरायला घेऊन माळराणावर गेला होता. परंतू त्या दिवशी तो घरी परतला नाही. जेव्हा त्याचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या डोळ्यात मिरची पावडर घातलेली होती. शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्याला बेदम मारहाण झाल्याचा उघड होते.
परंतू हैराण करणारी एक गोष्ट होती की त्याचे दोन्ही कुत्रे मृतदेहाच्या शेजारी बसले होते. आणि सर्व बकरी स्वत:च घरी परतल्या होत्या. हिच गोष्ट सर्वात हैराण करणारी होती. सर्व बकऱ्या कशा घरी परतल्या. मेंढपाळाशिवाय या बकरी कशा काय घरी स्वत:च परतल्या हे कळायला मार्ग नाही.
पोलीसांनी एक प्रयोग केला,सत्य उघडकीस आले..
बकऱ्या घरी परतल्याने पोलिसांना प्रश्न पडला आणि विचार करायला भाग पडले. कोणी तरी बकऱ्यांना घरापर्यंत नेले असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी एक अनोखा प्रयोग केला. रायप्पाचा छोटा भाऊ बसवराज याला त्यांनी त्याचा भाऊ रायप्पाचा मृतदेह मिळाला त्याच ठिकाणी तसेच झोपवले. त्याच वेळी तेथे बकऱ्या आणि दोन्ही कुत्र्यांना पुन्हा आणण्यात आले.
मग जे झाले ते धक्कादायक आणि आश्चर्यकारक होते. बसवराज याच्या शेजारुन हलण्यास बकऱ्या आणि कुत्रे तयार नव्हते. त्यांना ज्याची भीती होती तेच घडले. यावरुन हे स्पष्ट झाले की हाच व्यक्ती घटनेदिवशी त्यांच्या सोबत होता. आणि पोलिसांचा संशय खरा ठरला. खुनी रायप्पाचा भाऊच निघाला.
त्यांच्यात नेहमीच भांडणे होत ..
तपासात पुढे स्पष्ट झाले की बसवराज आणि रायप्पा या दोघांमध्ये अनेक दिवस भांडण सुरु होते. रायप्पाला वाटायचं की त्याच्या लहान भावाने बकरी चरायला न्याव्यात. बसवराजला दुसरे काम करायचे होते. यावरुन त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. अखेर त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची होत, वेळ हाणामारीवर आली आणि बसवराजने त्याच्या मोठ्या भावाला रागाच्या भरात ठार केल्याची कबुली दिली.
