पालघर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, ‘ऑपरेशन ऑलआऊट’ म्हणजे काय?

पालघरमधील 35 वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Palghar Operation All Out against criminals)

पालघर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, 'ऑपरेशन ऑलआऊट' म्हणजे काय?
Police

पालघर : वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पालघर पोलिसांच्या ऑपरेशन ऑलआऊटमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. पालघरमधील 35 वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Palghar Operation All Out against criminals)

पालघर पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या आदेशानुसार, शुक्रवारी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत ऑपरेशन ऑलआऊट ही मोहिम राबवण्यात आली. या दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या 35 वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. याद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

या दरम्यान जिल्ह्यातील 16 पोलीस ठाणे हद्दीमध्ये 35 महत्त्वाच्या ठिकाणी नाके बंदी करण्यात आली. या मोहिमेत जिल्हा पोलिस अधीक्षकांसह 48 पोलीस अधिकारी आणि 383 पोलीस अंमलदारांनी रात्रभर हे अभियान राबवले. या अभियानात 30 आस्थापनांवर कारवाई करत 221 वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये दारुबंदीचे चार गुन्हे आणि 121 ठिकाणी एकाच वेळी तपासणी करण्यात आली. या ऑपरेशनमुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.

‘ऑपरेशन ऑल आऊट’ म्हणजे काय?

ऑपरेशन ऑलआऊट या मोहिमेदरम्यान एकाच वेळेस अनेक कारवाई करण्यात येतात. फरार आरोपींची माहिती जमा करणे, नाकाबंदी, गस्त, कोम्बिंग ऑपरेशन, नशा करणाऱ्यांची धरपकड करणे इत्यादी कारवाई एकाचवेळी केली जाते. यादरम्यान पोलीस आयुक्त किंवा सहपोलीस आयुक्तांमार्फत आदेश दिले जातात. यावेळी ठराविक कालावधीसाठी कर्तव्यावर असलेले सर्व पोलीस सज्ज होतात. सर्व विभागांचे पोलिस उपायुक्तही या मोहिमत सहभागी होतात. या मोहिमेदरम्यान विभागात, पोलिस ठाण्याच्या हद्दीत या कालावधीत नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाते. (Palghar Operation All Out against criminals)

संबंधित बातम्या : 

चोरी करताना तो घालायचा साडी; तरीही 24 तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या

अर्धवट जळालेली तरुणी, बाजूला कपड्यांची बॅग आणि सायकल, मृतदेहाजवळच्या चिठ्ठीने संशय वाढवला

Published On - 7:24 am, Sun, 14 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI