AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरी करताना तो घालायचा साडी; तरीही 24 तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या

गेल्या सहा महिन्यांपासून कोपरगावातील एकाच परिसरात चोऱ्या करणारा शातीर चोर अखेर शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय.

चोरी करताना तो घालायचा साडी; तरीही 24 तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या
अशा प्रकारे जाळीवर चढून चोरटा चोरी करायचा.
| Updated on: Mar 13, 2021 | 6:44 PM
Share

शिर्डी : गेल्या सहा महिन्यांपासून कोपरगावातील (Kpargaon)  एकाच परिसरात चोऱ्या करणारा शातीर चोर अखेर शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये म्हणून हा चोर चोरी करताना चक्क साडी घालायचा. मात्र कोपरगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत या आरोपीला 24 तासांत बेड्या ठोकल्या. हा चोर मूळचा जळगाव जिल्हयातील शिवाजीनगर येथील असून संजय पाटील असं त्याचं नाव आहे. (thief in shirdi has been arrested who wears saree while theft)

साडी घालून करायचा चोरी

मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहरातील ठराविक परिसरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दुकानातील रोख रक्कम तसेच साहित्यांची चोरी करणारा भामटा पोलिसांना आव्हान देत होता. हा चोर साडीच्या दुकानातून साडी अंगावर पांघरून चोरी करत होता. दुकानात प्रवेश करण्यासाठी त्याला उंच जाळ्यांवर सहज चढण्याची कला अवगत केली होती. तसेच चक्क साडी अंगावर पांघरून तो चोरी करत होता.

पोलिसी खाक्या दाखवताच चोरीची कबुली

कोपरगाव भागात चोरीचे प्रकार वाढल्यामुले पोलीस चोराच्या मागावर होते. चंद्रहास या पैठणीच्या दुकानात चोरी करताना हा चोर सिसीटीव्हीत कैद झाला. मात्र साडी अंगावर असल्यामुळे त्याची ओळख पटणे अवघड झाले होते. मात्र,सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत पोलिसांनी उंची तसेच शरीराच्या हालचालीवरुन संशयित म्हणून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपी संजय पाटील यांने चोरीची कबुली दिली. आरोपीने गुन्हा मान्य केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरी करण्याच्या पद्धतीची कवायत करवून घेतली

दरम्यान, चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे कोपरगाव परिसरातील अशोका हॉटेलजवळचे सर्व व्यापारी त्रस्त झाले होते. मात्र शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोराच्या मुसक्या आवळल्याने व्यापाऱ्यांनी तसेच शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आणि तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

इतर बातम्या :

अर्धवट जळालेली तरुणी, बाजूला कपड्यांची बॅग आणि सायकल, मृतदेहाजवळच्या चिठ्ठीने संशय वाढवला

100 छापे, 102 दिवस पाठलाग, वेशांतर, रुमला लॉक लावून वास्तव्य, बाळे बोठेच्या अटेकमागील थरार

काऊंटडाऊन सुरु, सचिन वाझेंचा अंतरिम जामीन कोर्टाने फेटाळला, अटकेची टांगती तलवार

(thief in shirdi has been arrested who wears saree while theft)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.