ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देश सोडून गेल्याच्या बातमी येत असताना आता त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या बातमीची पुष्टी खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. परमबीर सिंह आपल्या घरी दिसून आले नाहीत. तसंच केंद्र आणि राज्यांच्या तपास यंत्रणांकडून अनेक समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता ठाणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. (Thane police issues look-out notice against Parambir Singh)