नितेश राणे आणि नीलम राणे विरोधात लूकआऊट सर्क्युलर, गृहमंत्री वळसे-पाटील काय म्हणाले?

राणेंच्या प्रकरणात आर्थिक तक्रार एका संस्थाने केली होती. केंद्र सरकारकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ती तक्रार पोलीस महासंचालकांना प्राप्त झाली. त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत लूकआऊट सर्कयुलर काढण्यास सांगितले, त्यानुसार ही कारवाई झाल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय.

नितेश राणे आणि नीलम राणे विरोधात लूकआऊट सर्क्युलर, गृहमंत्री वळसे-पाटील काय म्हणाले?
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 9:05 PM

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबद्दल पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून लूकआऊट सर्क्युलर काढण्यात आलं आहे. एअरपोर्ट अथॉरिटीला हे सर्क्युलर बजावण्यात आलं आहे. यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध राणे कुटुंब आमनेसामने आलं आहे. लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे यांनीही ठाकरे सरकारला इशारा दिलाय. या प्रकरणावर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Dilip Walse-Patil clarified role of Thackeray government over Lookout circular)

याबाबत केंद्र सरकारकडून एक पत्र गृह विभागाला प्राप्त झालं होतं. ते आम्ही पुणे पोलिसांना दिलं. त्यानुसार लूकआऊट सर्क्युलर दिलं आहे. राणेंच्या प्रकरणात आर्थिक तक्रार एका संस्थाने केली होती. केंद्र सरकारकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ती तक्रार पोलीस महासंचालकांना प्राप्त झाली. त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत लूकआऊट सर्कयुलर काढण्यास सांगितले, त्यानुसार ही कारवाई झाल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय?

नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत.

नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर आरोप

पाच महिने अगोदर आम्ही संबंधित बँकेला पत्र दिलं होतं की आम्हाला हे कर्ज सेटलमेंट करायचं आहे. बँकेकडे ते पत्र आहे. मग आता अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा हा की आमचं हे लोन अकाऊंट मुंबईच्या बँकेत आहे. मग, पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर का काढलं? जर एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला लोन सेटलमेंट करायचं असेल तर अशापद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थच नाही. हा पूर्ण राजकारणाचा भाग आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय.

हे लूकआऊट सर्क्युलर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देण्यात आलं आहे. सगळ्या एअरपोर्ट्सना. आम्ही या सर्क्युलरविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहोत. याला काही अर्थ नाही. कारण जे लोन आम्हाला 5 महिन्यांपूर्वी भरायचं होतं त्याची आता नोटीस काढून काही अर्थ नाही ना. ठाकरे सरकार आम्हाला घाबरलं आहे, अशा पद्धतीने पत्र आणि नोटीस काढत बसले आहेत.

नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे?

लूकआऊट नोटीस काढायचीच असेल तर मी यांना मुद्दे देतो. नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून गायब आहे. त्याचे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध आहेत. मग आता लूकआऊट नोटीस काढायची असेल तर आदित्य ठाकरेंबाबत काढायला हवी, की नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे? माझ्याकडे कागदपत्र आहेत. 2019 पर्यंत आदित्य ठाकरे आणि ते एका कंपनीत पार्टनर होते. अशा व्यक्तीबद्दल तुम्ही लूकआऊट नोटीस काढा, असं थेट आव्हानच नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला दिलंय.

येणाऱ्या काळात 7 हजार पोलिसांची भरती करणार- वळसे-पाटील

येणाऱ्या काळात 7 हजार पोलिसांची भरती करणार आहोत. आता 5 हजार पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. ती पूर्ण झाली की 7 हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहितीही वळसे-पाटलांनी दिलीय. त्याचबरोबर पोलिस कॉन्स्टेबल निवृत्त होण्यापूर्वी त्याला पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत बढती मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसंच पोलिसांच्या घरांसाठी प्रयत्न करणार असल्याचं वळसे-पाटील यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

लोकशाही भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही, अजित पवाराचं ठरलं!

Dilip Walse-Patil clarified role of Thackeray government over Lookout circular

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.