AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीने प्रेम विवाह केल्याने वाद, भडकलेल्या वडिलांवर आईवर कोयत्याने वार, जागीच मृत्यू

नाशिक शहरात पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून, तिला कुकरच्या झाकणाने मारहाण करून तिची हत्या केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सविता गोरे या विवाहीत महिलेचा मृत्यू झाला असून संपूर्ण शहर हादरलं आहे. पत्नीची हत्या करून तिचा पती फरार झाला.

मुलीने प्रेम विवाह केल्याने वाद, भडकलेल्या वडिलांवर आईवर कोयत्याने वार, जागीच मृत्यू
नाशिकमध्ये पतीने केली पत्नीची हत्या
| Updated on: Feb 05, 2025 | 12:26 PM
Share

नाशिक शहरात पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून, तिला कुकरच्या झाकणाने मारहाण करून तिची हत्या केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सविता गोरे या विवाहीत महिलेचा मृत्यू झाला असून संपूर्ण शहर हादरलं आहे. पत्नीची हत्या करून तिचा पती फरार झाला होता, मात्र गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीचा कसून शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे. त्याच रागाच्या भरात छत्रगुण गोरे या पतीने पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. यामुळे परिसरात मोठी दहशत माजली आहे.

मुलीचा राग पत्नीवर काढला, थेट जीवच घेतला

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी हत्येची ही घटना घडली. सविता गोरे आणि छत्रगुण गोरे हे नाशिकच्या गंगापूर परिसरातील स्वस्तिक निवास सोसायटीतील फ्लॅटमध्ये भाड्याने रहायचे. मंगवरी गोरे यांचा मुलगा कामावर गेल्यानंतर सविता आणि छत्रगुण हे दोघेच घरी होते. मुलीने प्रेमविवाह केल्याने गोरे दांपत्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. मंगळवारी मुलगा कामावर गेल्यावर त्या दोघांमध्ये पुन्हा याच कारणावरून वाद झाला.

मात्र बघता बघता ते भांडण वाढलं, वाद टोकाला गेला. संतापलेल्या छत्रगुण याने रागाच्या भरात सविता यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला, तसेच कुकरच्या झाकणाने त्यांना मारहाणही केली. यामुळे त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून भेदरलेल्या छत्रगुण यांनी घटनाश्थलावरून लागलीच पळ काढला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गंगापूर पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी पंचनामा केला. आरोपी पतीविरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. अथक तपासाअंती अखेर पोलिसांनी आरोपी पतीला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.