Nagar Accident : नगरमध्ये प्रवरा नदीपात्रात पिकअप कोसळला; एक बचावला, एकाचा मृतदेह गाडीतच‌ आढळला तर तिसरा बेपत्ता

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाजवळ असणाऱ्या प्रवरा नदीच्या पुलावर सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ये जा सुरू असताना काही जणांना पुलाचा कठडा तुटला असल्याचं लक्षात आलं. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर एखादं मोठं वाहन प्रवरा नदीपात्रात पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

Nagar Accident : नगरमध्ये प्रवरा नदीपात्रात पिकअप कोसळला; एक बचावला, एकाचा मृतदेह गाडीतच‌ आढळला तर तिसरा बेपत्ता
नगरमध्ये प्रवरा नदीपात्रात पिकअप कोसळला
Image Credit source: TV9
मनोज गाडेकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 18, 2022 | 1:21 AM

संगमनेर : नाशिकहून काचा घेऊन आलेला पिकअप सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात वाहून गेल्या (Swept Away)ची धक्कादायक घटना घडली होती. पिकअपमध्ये एकूण तिघेजण होते. त्यातील एकजण आश्चर्यकारकरित्या‌ बचावला असून, त्याने पोलिसांकडे घटनेची माहिती दिल्यानंतर याचा उलगडा झाला. स्थानिक पोलिस आणि महसूल प्रशासनाने शोधकार्य (Search Operation) सुरू केले. मात्र भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत गेल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या‌ सुचनेवरून ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम बुधवारी सायंकाळी 5 वाजता दाखल झाली आणि त्यांना बुडालेली पिकअप नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले.

प्रवरा नदीवरील पुलाचा कठडा तुटल्याचं नागरिकांच्या लक्षात आले

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाजवळ असणाऱ्या प्रवरा नदीच्या पुलावर सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ये जा सुरू असताना काही जणांना पुलाचा कठडा तुटला असल्याचं लक्षात आलं. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर एखादं मोठं वाहन प्रवरा नदीपात्रात पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेची चर्चा वाढल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पांडुरंग पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. गाडी वाहून गेल्याची प्राथमिक माहिती त्यांना समजली आणि त्यांनी महसूल प्रशासनाला माहिती देत शोधकार्य हाती घेतले.

नदीतील पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने बचावकार्यात अडचणी

दरम्यान भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदीपात्रात विसर्ग वाढत गेला. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने बचावकार्य करण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर महसूल प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या‌ सुचनेवरून एनडीआरएफ टीम मदतकार्यासाठी पोहोचली. मंगळवारी दुपारी 4 वाजता या घटनेत बचावलेला अमोल खंदारे हा तरुणच समोर आल्यानंतर घटनेची खरी माहिती समोर आली. या घटनेत वाहनासह चालक प्रकाश सदावर्ते आणि सुभाष खंदारे हे दोघे बेपत्ता होते.

बचावलेल्या अमोल खंदारेने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

सदर घटना घडल्यानंतर घडलेला सर्व किस्सा अमोलने सांगितला. गाडी बुडाल्यानंतर एकजण पोहोत तेथून बाहेर निघाला. रात्री बचावल्यानंतर अमोलने जोर्वे ते संगमनेर हे 10 किमी अंतर पायी चालत जाऊन संगमनेरहून ट्रकमधून पहाटे थेट नाशिक‌ येथील आपले घर गाठले. त्यानंतर तो पुन्हा घटनास्थळी पोहचला आणि घटनेचा उलगडा झाला. पिकअप सह दोघेजण बेपत्ता असल्याने ठाणे आपत्ती व्यवस्थापन टिमला प्राचारण करण्यात आले. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल 50 तासानंतर नदीपात्रातून पिकअप बाहेर काढण्यात यश आले. या पिकअपमध्ये वाहन चालक प्रकाश सदावर्ते याचा मृतदेह आढळून आला आहे, तर सुभाष खंदारे हा अद्यापही बेपत्ता आहे. रात्री शोधकार्यात अडचणी असल्याने सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याच संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे यांनी सांगितलं. (Pick up falls in Pravara river bed in Nagar; One escaped, the body of one was found in the car)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें