Pitbull Case : आईचा जीव घेणाऱ्या पिटबुलला वाचवण्यासाठी मालकाची धडपड, नगरपालिकेकडून आता पिटबुल ट्रेनरकरडे, घरी परतण्यासाठी मालकाचे प्रयत्न

अमितच्या ताब्यात महापालिकेने पिटबुलला दिले आणि तो त्याला श्वान प्रशिक्षकाकडे घेऊन गेला. जर प्रशिक्षकाचे प्रशिक्षण आणि त्या कुत्र्यांची वागणूक सर्व काही ठीक असेल तरच ब्राउनीला त्याचा मालक अमितकडे परत जाण्याची परवानगी दिली जाईल. 

Pitbull Case : आईचा जीव घेणाऱ्या पिटबुलला वाचवण्यासाठी मालकाची धडपड, नगरपालिकेकडून आता पिटबुल ट्रेनरकरडे, घरी परतण्यासाठी मालकाचे प्रयत्न
आईचा जीव घेणाऱ्या पिटबुलला वाचवण्यासाठी मालकाची धडपड, नगरपालिकेकडून आता पिटबुल ट्रेनरकरडे, घरी परतण्यासाठी मालकाचे प्रयत्नImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 8:26 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊच्या (Lucknow) कैसरबागच्या बंगाली टोलामध्ये वृद्ध मालकिणीचा चावा गेऊन जीव घेणारा पिटबुल जातीचा कुत्रा ब्राउनी (Pitbull Case) आता ट्रेनरपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं.  सोमवारी दिवसभर पिटबुलच्या कोठडीवरून युक्तीवाद सुरू होता. पिटबुलचे मालक जिम ट्रेनर अमित त्रिपाठी सकाळी पालिका कार्यालयात पोहोचले असता त्यांना प्रतिज्ञापत्र देऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी आले. यानंतर इतर अनेक पिटबुल प्रेमी देखील त्याला ताब्यात घेण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले. नंतर अमितच्या ताब्यात महापालिकेने पिटबुलला दिले आणि तो त्याला श्वान प्रशिक्षकाकडे घेऊन गेला. जर प्रशिक्षकाचे प्रशिक्षण आणि त्या कुत्र्यांची वागणूक सर्व काही ठीक असेल तरच ब्राउनीला त्याचा मालक अमितकडे परत जाण्याची परवानगी दिली जाईल.

कुत्र्यांची ट्रेनरकडे रवानगी

आपल्या आईच्या निधनाने दु:खी झालेले अमित त्रिपाठी म्हणाले, या संपूर्ण घटनेत ब्राउनीला दोषी मानता येणार नाही. प्राणी कधीकधी नियंत्रण गमावतात.त्यामुळे आपण त्यांना सोडू शकत नाही. तसेच आता कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही आमचा कुत्रा महापालिकेतून ट्रेनरकडे नेला आहे. तेथून प्रमाणपत्र मिळेल, त्याआधारे पिटबुलबाबत पुढचे निर्णय घेतले जातील. कुत्र्याला घरी आणाल का? या प्रश्नावर अमित म्हणाले की मी त्याला नक्कीच घरी आणणार. आता आमची आई राहिली नाही, मात्र कुत्र्याला याची शिक्षा कशी देणार? जेव्हा त्याचे प्रशिक्षण संपले आणि कुत्र्याचे वर्तन सामान्य असल्याचे आढळले, तेव्हा त्याला घरात ठेवण्यास काय हरकत आहे? असा सवालही त्याच्या मालकाने केला आहे.

महापालिकेचा मालकाला थेट ताबा देण्यास नकार

आपल्या मालकिणीचा जीव घेणाऱ्या पिटबुल ब्राउनीला महापालिकेच्या वतीने एबीजे सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे त्याच्या वर्तनावर 14 दिवस नजर ठेवण्यात आली होती. या काळात तो काही गंभीर हलचाली करताना दिसला नाही. मात्र पिटबुलला श्वान प्रशिक्षकाकडेच सोपवले जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या स्थितीत कुत्रा परत देऊ नका असे मालकाला सांगण्यात आले. त्यामुळेच आता त्याची रवानगी ही ट्रेनरकडे करण्यात आली आहे. आपण प्राण्यांना आपल्या मुलाप्रमाणे जीव लावतो. मात्र योग्य ती काळजी न घतल्यास आणि अचानक पाळीव प्राणीच हिंसक झाल्यास किती महागात पडू शकतं, हेही या चर्चेतल्या केसने दाखवून दिलं आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.