AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोतया IAS महिलेचे पाक लष्कराशी थेट कनेक्शन, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ, यंत्रणा अलर्ट

Chhatrapati Sambhajinagar Crime: दिल्ली स्फोटानंतर यंत्रणा अलर्ट आहेत. त्यातच छत्रपती संभाजीनगरमधील एका तोतया IAS महिलेचे थेट पाकिस्तानच्या लष्कराशी कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला गेल्या सहा महिन्यांपासून एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे.

तोतया IAS महिलेचे पाक लष्कराशी थेट कनेक्शन, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ, यंत्रणा अलर्ट
कल्पना भागवत
| Updated on: Nov 27, 2025 | 9:18 AM
Share

Kalpana Bhagwat: दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. जैश-ए-मोहम्मद या पाक दहशतवादी संघटनेचा त्यात हात असल्याचे समोर येत आहे. यामध्ये व्हाईट कॉलर डॉक्टरचा सहभाग उघड झाल्यापासून यंत्रणा सतर्क आहेत. स्लीपर सेलमधील अनेकांची उचलबांगडी करण्यात येत आहे. हा घटनाक्रम सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आलेल्या एका तोतया IAS महिलेचे थेट पाकिस्तानच्या लष्कराशी कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला आईसह येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. ती मूळची छत्रपती संभाजीनगरची असून तिचे वडील शिक्षक असल्याची आणि एक भाऊ हडको भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

कल्पना भागवत एजंट?

तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना त्रिंबकराव भागवत हिला १० दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती गेल्या 6 महिन्यांपासून वास्तव्यास आहे. तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत ही पाकिस्तानच्या अफगाण राजदुतासह इतर 11 दुरध्वनी, मोबाईल क्रमांकांशी दहा महिन्यांपासून संपर्कात होती अशी माहिती आता समोर येत आहे. पोलिस तपासात ही धक्कादायक बाब समजली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या ११ क्रमांकाचा तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाक लष्कराच्या संपर्कात

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भागवत हिच्या पडेगाव येथील घराची झाडाझडती घेतली असता 19 कोटींचा धनादेश, संशयास्पद प्रमाणपत्रं तसेच परदेशी क्रमांकाशी नियमीत संपर्क होत असल्याचे समोर आले आहे. तिच्या मोबाईलमद्ये पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यांचे क्रमांक, अफगाणी नेटवर्क, तर चॅट हिस्ट्री डिलीट केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ती गुप्तहेर आहे का, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. तिने यापूर्वी दिल्ली, उदयपूर आणि जोधपूरला वारंवार विमान प्रवास केल्याचे उघड झाले आहे.

तपासात तिचे अफगाणिस्तानचा नागरिक व भारतात व्यावसायिक म्हणून वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अशरफ खिल याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत दहशतवादविरोधी पथकाने तपासात उडी घेतली. बुधवारी कल्पनाच्या पहिल्या पोलिस कोठडीची मुदत संपली. देशविघातक कृत्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी कल्पना भागवतला बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. तिच्या पोलीस कोठडीत 10 दिवसांची वाढ झाली.

मूळची छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव येथील कल्पना भागवत हिच्याकडे आयएएस असल्याचे बनावट लेटरहेड, संशयास्पद प्रमाणपत्र आढळले आहेत. याप्रकरणी दहशतवाविरोधी पथकासह केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही तपासात उतरल्या आहेत. डिलीट केलेले चॅट हस्तगत केल्यानंतर आणि तिची कॉल हिस्ट्री हाती लागल्यानंतर या प्रकरणात मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.