AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Ransom : नवरा पाहिजेल तर पाच लाख दे, पत्नीकडून खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवलीत राहणारे अतुल व्यापारी हे बँकेतून कर्ज पास करून देणे, व्याजाने पैसे देणे यांसारखे व्यवहार करतात. रेल्वे मध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या अजयने 2021 मध्ये अतुल यांच्यासोबत एक व्यवहार केला होता.

Kalyan Ransom : नवरा पाहिजेल तर पाच लाख दे, पत्नीकडून खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठेकेदाराचे अपहरण करत खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटकImage Credit source: tv9
| Updated on: Jul 18, 2022 | 1:06 AM
Share

डोंबिवली : पैसे परत करत नसल्याने एका व्यक्तीला डांबून ठेवत त्याच्या पत्नीकडे 5 लाख रुपयाची खंडणी (Ransom) मागणाऱ्या खंडणीखोराला डोंबिवलीतील टिळक नगर पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अतुल व्यापारी असे सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अजय जाधव असे खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे. एका व्यवहारात अजयने दिलेले 2 लाख 80 हजार रुपये अतुल व्यापारी हे परत करत नसल्याने त्यांचे अपहरण (Kidnapping) करुन मारहाण केली. अजय जाधव हा रेल्वेत मॅकेनिक आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी व्यापारी यांच्या पत्नीने टिळक नगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडून अतुल यांची सुखरूप सुटका केली आहे.

अपहरण करुन रेल्वे वसाहतीतील डांबले

आरोपीने व्यापारी यांचे अपहरण करून त्यांना 8 दिवस स्वतःच्या माटुंगा येथील रेल्वे कॉलनीतील घरात डांबून ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी पत्नीकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. डोंबिवलीत राहणारे अतुल व्यापारी हे बँकेतून कर्ज पास करून देणे, व्याजाने पैसे देणे यांसारखे व्यवहार करतात. रेल्वे मध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या अजयने 2021 मध्ये अतुल यांच्यासोबत एक व्यवहार केला होता. त्यासाठी 2 लाख 80 हजार रुपये त्याने अतुलला दिले होते. मात्र पैसे परत देत नसल्याने अजय याने अतुल डोंबिवलीत 9 जुलै रोजी भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांचे अपहरण करत त्यांना माटुंगा येथील रेल्वे वसाहतीतील घरात डांबून ठेवले. पुढे अतुल यांची पत्नी ऋचा यांच्या फोनवर नवरा हवा तर 5 लाख रुपये दे अशी मागणी केली. ऋचा यांनी 3 लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. मात्र अजय 5 लाखावर अडून बसल्याने अखेर शुक्रवारी तिने टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली.

खंडणीचे पैसे घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

तक्रार दाखल होताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे, पोलीस नाईक जाधव, घुगे, महाजन, चंदने यांच्या पथकाने अतुल यांचा शोध सुरू केला. ऋचा यांनी 5 लाख घेण्यासाठी अजयला डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. या हॉटेलात पोलिसांनी सापळा लावत खंडणीचे पैसे घेत असलेल्या अजयला रंगेहाथ पकडून अतुलची सुटका केली. त्यानंतर पत्नीच्या व अतुलच्या फिर्यादीनंतर अजयला बेड्या ठोकत कल्याण सत्र न्यायालयात हजर केले. रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने अजयला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Police arrested the accused who kidnapped the husband and demanded ransom from the wife)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.