AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैयक्तिक कामासाठी हवालदार घरी आला, गळा चिरुन हत्या, शत्रूचा घाट की नक्षली समर्थकांचं कृत्य?

वैयक्तिक कामानिमित्त स्व:तच्या घरी आलेल्या पोलीस हवालदाराचा गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वैयक्तिक कामासाठी हवालदार घरी आला, गळा चिरुन हत्या, शत्रूचा घाट की नक्षली समर्थकांचं कृत्य?
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 9:51 PM
Share

गडचिरोली : वैयक्तिक कामानिमित्त स्व:तच्या घरी आलेल्या पोलीस हवालदाराचा (Police constable) गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागेपल्ली येथे हा प्रकार घडला. जगन्नाथ सिडाम असे हत्या झालेल्या हवालदाराचे नाव असून ते भामरागड तालुक्यातील धोडराज येथे कार्यरत होते. सिडाम यांची हत्या करुन आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा सोध घेत आहेत. (Police constable murdered by unknown person in Gadchiroli District)

वैयक्तिक कामासाठी हवालदार स्वतःच्या घरी आले

मिळालेल्या माहितीनुसार जगन्नाथ सिडाम हे भामरागड तालुक्यातील धोडराज येथे कार्यरत होते. आज (5 जुलै) पहाटे ते वैयक्तिक कामासाठी नागेपल्ली येथे त्यांच्या स्वतःच्या घरी आले. आलापल्ली या मुख्य शहराला लागून नागेपल्ली हा भाग आहे.

अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला

मात्र, भल्या पहाटे घरी आल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच हल्ला करुन त्यांचा गळा चिरला. या गंभीर हल्ल्यामध्ये हवालदार सिडाम हे गंभीर जखमी झाले. अचानकपणे केलेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ ऊडाली.

हवालदाराचा कोणी शत्रू आहे का ? की कोण्या नक्षल समर्थकाचे हे काम ?

ही घटना घडल्यानंतर सिडाम यांना उपचारासाठी चंद्रपूरमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सिडाम यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून हल्ला करणारी व्यक्ती हवालदाराचा कोणी शत्रू आहे का ? की तो कोणी नक्षल समर्थक आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.

इतर बातम्या :

दरोड्यासाठी गावठी कट्टा, कोयता, सुरीचा उपयोग; मनसेच्या पदाधिकाऱ्यासह 4 जणांना बेड्या

आधी सोशल मीडियावर ओळख, नंतर वारंवार लैंगिक अत्याचार, वाद झाल्यामुळे अपहरणाचा व्हिडीओ केला व्हायरल, नागपूर हादरलं !

अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात कामाची संधी, आता करतो मोबाईलची चोरी, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

(Police constable murdered by unknown person in Gadchiroli District)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...