AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चूळ भरायच्या निमित्ताने गेला अन् हवालदाराच्या अंगावर थेट पेट्रोलच… पुणे पुन्हा हादरले; पोलिसांचं नेमकं स्टेटमेंट काय?

शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात जे घडलं त्याने संपूर्ण शहरच हादरलं. पोर्श कार अपघात, पबमधील ड्र्ग्स यामुळे शहराची चर्चा होत असतानाच काल संध्याकाळी आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या इसमाला ट्राफिक पोलिसांनी रोखलं असता, त्याने त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

चूळ भरायच्या निमित्ताने गेला अन् हवालदाराच्या अंगावर थेट पेट्रोलच... पुणे पुन्हा हादरले; पोलिसांचं नेमकं स्टेटमेंट काय?
| Updated on: Jul 06, 2024 | 1:14 PM
Share

शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात जे घडलं त्याने संपूर्ण शहरच हादरलं. पोर्श कार अपघात, पबमधील ड्र्ग्स यामुळे शहराची चर्चा होत असतानाच काल संध्याकाळी आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या इसमाला ट्राफिक पोलिसांनी रोखलं असता, त्याने त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे शहरात एकच खळबळ माजली असून आता याप्रकरणाचे आणखी अपडेट्स समोर येऊ लागले आहेत. शहरातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल हा प्रकार घडला. ज्यांच्या अंगावर हे पेट्रोल टाकण्यात आलं, ज्यांनी त्या पोलिसांना वाचवल त्या पोलिसांनीच या भीषण घटनेचा अनुभव सांगितलं. चूळ भरायच्या निमित्ताने तो आरोपी बाजूला गेला आणि परत आल्यावर त्याने थेट हवालदाराच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि हातातील लायटर पेटवून तो पुढे आला, असे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने गस्तीवर इतर पोलिस तिथे होते, त्यांनी हे पाहिल्यावर तातडीने धाव घेतली आणि त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

संजय फकिरा साळवे असे आरोपीचे नाव असून तो मद्यधुंद वस्थेत गाडी चालवत होता. आरोपी संजय हा पिंपरी-चिंचवड येथे राहणारा असून त्याचं मूळ गाव हे जालना असल्याचं समजतं. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितला आखोंदेखा हाल

या घटनेच्या वेळेस उपस्थित असलेल्या पुणे महिला पोलिस अधिकारी यांनी त्या प्रसंगाचा हादरवणारा अनुभव कथन केला. सध्या दररोज लक्ष्मी रोडवरील बुधवार चौकात ड्रिंक अँड ड्राईव्हविरोधात कारवाई सुरू आहे. काल ( शुक्रवार) संध्याकाळी देखील ही कारवाई सुरू होती. त्यावेळी एक बाईकस्वार ( आरोपी संजय साळवे) हा येताना दिसला. पण तो वेडीवाकडी गाडी चालवत असल्याने वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी त्याला बाजूला घेतले. त्याची चौकशी करत असताना, त्याच्या तोंडाला वास येऊ लागल्याने चेकिंग करण्यासाठी जवळच कार्यालयात आणण्यात आलं.

चूळ भरून येतो सांगितलं आणि..

हवालदार समीर सावंत हे ब्रेथ ॲनलायझरद्वारे त्याचं चेकिंग करत होते, तो प्रतिसाद देत नव्हता. गोंधळ घालू लागला, म्हणून पोलिसांनी त्याला थांबवलं. त्यादरम्यान तो पाणी पिण्यासाठी आणि चूळ भरण्यासाठी बाहेर गेला आणि त्याने परत आल्यावर हवालदार सावंत यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं. आणि तुला जाळून टाकतो असे म्हणू लागला. ते पाहू मी व इतर सहकाऱ्यांनी त्याला रोखण्यासाठी पुढे झेप घेतली, तेव्हा त्याने आमच्याही अंगावर पेट्रोल फेकलं. आणि डाव्या हातातील लायटर पेटवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात इतर पोलिसांनी त्याला रोखलं आणि लायटर काढून घेतला. आरोपी साळवे याला अटक करण्यात आली असून विश्रमाबाग पोलिस स्टेशनमधील अधिकारी पुढील चौकशी सुरू करत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.