AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्लफ्रेंडशी फाटलं, प्रेमसंबंधात आला दुरावा, रागात अल्पवयीन मुलाने तरूणाचा काटाच काढला

सौरभ आठवले याने मांगडेवाडीतील एका अल्पवयीन मुलीला बहिण मानले होते. मुलीच्या घरच्यांची सौरभ याचे घरगुती संबंध प्रस्थापित झाल्याने, तीला शाळेत आणणे- सोडण्याचे कामं सौरभ करत असे. मात्र त्याच मुलीशी आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाचे प्रेमसंबंध होते. हे प्रकरण सौरभला कळल्यानंतर त्याने जे केलं ते थेट त्याच्या जीवावरच बेतलं.

गर्लफ्रेंडशी फाटलं, प्रेमसंबंधात आला दुरावा, रागात अल्पवयीन मुलाने तरूणाचा काटाच काढला
पुणे क्राईम न्यूज
| Updated on: Aug 23, 2025 | 11:36 AM
Share

राज्यामध्ये सध्या गुन्ह्यांच्या अनेक घटना उघडकीस येत असून विद्येचं माहेर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातही अनेक गुन्हे घडल्याचे समोर येत आहे. पुण्यातील कात्रजच्या बोगद्याजवळ झालेल्या एका खुनामुळेही मोठी खळबळ माजली होती. तेथे एका युवकाचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. मात्र राजगड पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या खुनाचा उलगडा करत आरोपींचा छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

नेमकं काय झालं ?

पुण्यातील भोरच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी (ता. भोर) परिसरात जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडील डोंगरावर 19 ऑगस्ट रोजी सकाळी एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

राजगड पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनीही तपासाची जबाबदारी घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. चौकशीत मृताची ओळख सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, पुणे, मूळ सोलापूर) अशी पटली होती. त्याच्या नातेवाईकांनी एक दिवस आधीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.

त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फूटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने वेगाने तपास सुरू केला. तपासादम्यान डी. बी. पथकातील पो.शि. अक्षय नलावडे यांच्या समोर धक्कादायक माहिती आली की, एक अल्पवयीन बालक आणि त्याच्या साथीदारांनीच सौरभचा खून केला आहे. यांनतर पोलिसांनी सापळा रचून श्रीमंत अनिल गुन्जे (वय २१, रा. खंडोबा मंदीर जवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. ढोले वाडा, वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८ वर्षे, रा. गोकुळनगर कात्रज) तसेच दोन अल्पवयीन मुलांना अवघ्या 12 तासात ताब्यात घेतले.

प्रेमसंबंधात दुरावा आल्याने जीवच घेतला

सौरभ आठवले याने मांगडेवाडीतील एका अल्पवयीन मुलीला बहिण मानले होते. मुलीच्या घरच्यांची सौरभ याचे घरगुती संबंध प्रस्थापित झाल्याने, तीला शाळेत आणणे- सोडण्याचे कामं सौरभ करत असे. मात्र त्याच मुलीशी आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाचे प्रेमसंबंध होते. हे प्रकरण सौरभला कळल्यानंतर त्यानी हे मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले. यानंतर संबंधित मुलाला तो राहत असलेल्या मुली शेजारच आत्याचे घर सोडून, त्याच्या वडिलांनी त्याला पुन्हा वडगाव मावळ येथील त्याच्या वडिलांच्या घरी बोलवले. त्यामुळे प्रेमसंबंधात आलेल्या दुराव्याचा राग मनात धरून त्याने मित्रांच्या मदतीने सौरभचा खून करण्याचा कट रचला. सौरभला बोलावून डोंगरात नेण्यात आले आणि कोयत्याने आणि इतर हत्यारांनी वार करून त्याचा खून करण्यात आला.

संशयित आरोपींकडून ॲक्टिव्हा, स्प्लेंडर मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. काळ्या रंगाची मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली असून महत्त्वाचे तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. अटक संशयित आरोपींना भोर न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील, उपनिरीक्षक वृषाली देसाई तसेच अंमलदार सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, नाना मदने, राहुन कोल्हे, अजित माने, निलेश राणे, अमोल तळपे, अनिल मेस्त्री, अक्षय नलावडे, राहुल भडाळे, मंगेश कुंभार यांच्या पथकाने केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.